काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी आज हरियाणातील असंध येथे एका प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाना साधत, शेतकरी, तरुण आणि जातनिहाय जनगणना आदी मुद्यांवर भाष्य केले. तसेच, हरियाणातील तरुण अमेरिकेत का जात आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
जातनिहाय जनगणेसंदर्भात काय म्हणाले राहुल? -जातनिहाय जनगणेसंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, "इलेक्शन कमीशनमध्ये भाजपचे लोक, ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांमध्ये भाजपचे लोक, आपल्याला येथे गरीब आणि दुसऱ्या जातीची लोकं सापडणार नाहीत. यामुळे आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहोत."
राहुल गांधी म्हणाले, "भाजपवाले संविधानावर हल्ला करत आहेत. भारतात कुणाची संख्या किती आहे? ते आम्ही तपासायला सांगत आहोत. आरएसएस जातनिहाय जनगणना करायला सांगतो, पण आतून नकार देतो. गरीब मागास आपल्याला मोठ्या पदावर दिसणार नाही."
'अमेरिकेत जाण्यासाटी जमीन विकली' -राहुल गांधी म्हणाले, "मी अमेरिकेत गेलो होते, तेव्हा बघितले की, एका रूममध्ये 15 ते 20 लोक झोपलेले पाहिले. त्यावेळी एका तरुणाने मला सांगितले की, त्यांतील अनेकांनी अमेरिकेत येण्यासाठी 30 ते 50 लाख रुपयांचे कर्ज तरी गेतले आहे अथवा त्यांची जमीन तरी विकली आहे. यावर मी म्हणालो की, एवढ्या पैशात तर ते हरियाणामध्ये एखादा चांगला बिझनेस सुरू करू शकले असते. यावर तो तरुण म्हणाला, राज्यात असे करणे शक्य नाही."
राहुल गांधी पुडे म्हणाले, "ही लढाई हरियाणा नव्हे, तर भारताला वाचविण्यची आहे. देशातील सर्व संस्था आरएसएसच्या हवाली करून दिल्या आहेत. ज्यांवर नागपूरचा कंट्रोल आहे. त्यांत भारतातील 90 टक्के लोकांसाठी कुठलेही स्थान नाही."