काँग्रेस नेते तथा माजी खासदार राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. वाशिंगटन डीसीतील नॅशनल प्रेस क्लबमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांना प्रश्न करण्यात आला की, केरळमध्ये आपली इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) सोबत युती आहे? यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, मुस्लीम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. मुस्लीम लीगच्या बाबतीत गैर-धर्मनिरपेक्ष असे काहीही नाही. एवढेच नाही, तर भारतातील प्रेस फ्रीडम कमकुवत होत आहे, हे कोणापासूनही लपलेले नाही आणि हे सर्वच जण जानतात. लोकशाहीसाठी प्रेस फ्रीडम अत्यंत महत्वाचे आहे आणि टीकाही ऐकली जायला हवी, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
परकीय भूमीवर काय म्हणाले राहुल गांधी? -काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, संस्थात्मक गोष्टीही निंत्रीत केल्या जात आहेत. आपण हा प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारायला हवा. हे आपण कसे कराल, मला महीत नाही. मात्र आपण विचारायला हवे. भारताकडे अत्यंत मजबूत व्यवस्था आहेत, ज्या पूर्वीपेक्षाही मजबूत आहेत. ती व्यवस्था कमकूवत झाली आहे.
लोकशाही व्यवस्थेवरही राहुल गांधींचा निशाणा -राहुल गांधी म्हणाले, जर लोकशाही व्यवस्थेला प्रोत्साहन दिले गेले, तर हे मुद्दे अपोआपच सुटतील. आपल्याकडे संस्थांचा एक स्वतंत्र गट असायला हवा, जो प्रेशर आणि कंट्रोलमध्ये नसावा. काँग्रेस पक्ष एक अशी संस्था आहे, जिने संस्थांची संकल्पना मांडली. आम्ही त्यांच्याकडे आमच्या संस्था म्हणून पाहत नाही, तर राज्यांच्या संस्था म्हणून पाहतो. या संस्था स्वतंत्र आणि तटस्थता असाव्यात, हे आम्ही निश्चित केले.