देशात 2014 पासून हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे. हिंदू सत्तेबाहेर आहेत. या हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून हटवून हिंदूंना सत्तेवर आणायचे आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारवर हल्ला चढवला. एवढेच नाही, तर आम्हाला घाबरवले जाऊ शकत नाही. आम्ही मृत्यूला भीत नाही. हिंदुत्ववाद्यांना फक्त सत्ता हवी आहे, सत्य नाही. त्यांचा मार्ग सत्याग्रह नसून 'सत्ता'ग्रह आहे. हिंदू आपल्या भीतीचा सामना करतो, तो शिव शंकराप्रमाणे आपली भीती प्राशन करून टाकतो. मात्र, हिन्दुत्ववादी भीतीत जगत असतात.
राजस्थानची राजधानी जयपूर येथे आज काँग्रेसची मेगा रॅली (Congress Mahangai Hatao Rally in Jaipur) पार पडली. रॅलीत सहभागी होण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी जयपूरला पोहोचले होते. सोनिया गांधीही बऱ्याच दिवसांनंतर सभेत दिसल्या. मात्र, सोनियांनी रॅलीला संबोधित केले नाही.
काँग्रेसने महागाईच्या मुद्द्यावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या शिवाय आपल्या दिग्गज नेत्यांना एका व्यासपीठावर आणले होते आणि केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला. या कार्यक्रमासाठी जयपूरच्या विद्यानगर स्टेडियमवर काँग्रेसने मोठे व्यासपीठ सजविले होते. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या इतरही काही बड्या नेत्यांचे पोस्टर्स आणि कटाऊट्स लावण्यात आले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गरदी केली होती.
2014 पासून हिन्दुत्ववादी सत्तेवर, त्यांना हटवायचे आहे - राहुल म्हणाले, हिंदुत्ववाद्यांना सत्याशी काही देणे-घेणे नाही. हिंदू सत्याच्या शोधात कधीच झुकत नाही. पण हिंदुत्ववाद्याच्या मनात नेहमीच द्वेष भरलेला असतो. कारण त्याच्या मनात भीती असते. तुम्ही सर्व हिंदू आहात. हिंदुत्ववादी हे सत्तेचे भुकेले आहेत. 2014 पासून हिंदुत्ववादी सत्तेत आहेत, हिंदू सत्तेबाहेर आहेत. आपल्याला या हिंदुत्ववाद्यांना हटवून, हिंदूंना सत्तेत आणायचे आहे. याच बरबोर, हिंदुत्ववाद्यांना फक्त सत्ता हवी आहे, सत्य नाही. त्यांचा मार्ग सत्याग्रह नसून 'सत्ता'ग्रह आहे. हिंदू आपल्या भीतीचा सामना करतो, तो शिव शंकराप्रमाणे आपली भीती प्राशन करून टाकतो. पण, हिन्दुत्ववादी भीतीत जगत असतात.
महात्मा गांधी हिंदू, गोडसे हिंदुत्ववादी -राहुल गांधी म्हणाले, "मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही. हे सर्व हिंदू आहेत पण हिंदुत्ववादी नाहीत. आज मला तुम्हाला हिंदू आणि हिंदुत्ववादी यातील फरक सांगायचा आहे. महात्मा गांधी हिंदू, गोडसे हिंदुत्ववादी. काहीही झाले तरी हिंदू सत्याचा शोध घेतो. गर पडली तर तो त्यासाठी जीवाचीही परवा करत नाही, तो सत्याचा शोध घेतो. त्याचा मार्ग सत्याग्रहाचा आहे. तो संपूर्ण जीवन सत्याच्या शोधात घालवतो. महात्मा गांधींनी माय एक्सपिरियन्स विथ ट्रुथ हे आत्मचरित्र लिहिले, म्हणजे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्य समजून घेण्याच्या प्रयत्नात घालवले आणि शेवटी एका हिंदुत्ववाद्याने त्यांच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या, असेही राहुल म्हणाले.
हेही वाचा -- 'मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही...'; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितला दोन्ही शब्दांतील फरक- “७० वर्षांचं सोडून द्या, गेल्या ७ वर्षांत तुम्ही काय केलं ते सांगा”; प्रियंका गांधींचा हल्लाबोल