राहुल गांधींनी शिवलेल्या चप्पलला सोन्याचा भाव; लोक म्हणताहेत वाटेल ती किंमत देतो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 05:43 AM2024-08-02T05:43:09+5:302024-08-02T05:43:50+5:30

चेतराम यांनी राहुल गांधी यांनी शिवलेली चप्पल विकण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

rahul gandhi sewn slippers cost very increased | राहुल गांधींनी शिवलेल्या चप्पलला सोन्याचा भाव; लोक म्हणताहेत वाटेल ती किंमत देतो

राहुल गांधींनी शिवलेल्या चप्पलला सोन्याचा भाव; लोक म्हणताहेत वाटेल ती किंमत देतो

सुलतानपूर :राहुल गांधी २६ जुलै रोजी सुलतानपूर येथील गटई कामगाराच्या दुकानावर थांबले होते. यावेळी त्यांनी चेतराम या गटईशी चर्चा करत एक चप्पल आणि शूज शिवला होता. राहुल गांधींनी शिवलेली चप्पल खरेदी करण्यासाठी लोक सध्या रांगेत असून, ते चप्पलची मागेल ती किंमत देण्यास तयार आहेत.

लोक चप्पलसाठी १० लाख रुपये देत आहेत, असे चेतराम यांनी सांगितले. राहुल गांधींनी भेटीनंतर चेतराम यांच्यासाठी शूज आणि चप्पल शिवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मशीनची भेट पाठविली होती.

चप्पल फ्रेम करून ठेवणार 

चेतराम यांनी राहुल गांधी यांनी शिवलेली चप्पल विकण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जिवंत असेपर्यंत ही चप्पल फ्रेम करून दुकानात ठेवणार आहे, असे त्यांनी सांगितले.

 

Web Title: rahul gandhi sewn slippers cost very increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.