नवी दिल्ली - काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी म्हटले आहे, की ज्या शेतकऱ्यांची मुलं देशाच्या सीमेवर आपला जीवही अर्पण करतात. त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी केंद्र सरकारने दिल्लीच्या सीमांवर खिळे अंथरले आहेत. ते म्हणाले, शेतकरी आपला अधिकार मागत आहेत. मात्र, केंद्र सरकार त्यांना अधिकार देण्याऐवजी त्यांच्यावर अत्याचार करत आहे. (Rahul Gandhi slams center over farmers protest 100 days)राहुल गांधींनी ट्विट केले आहे, "देशाच्या सीमेवर ज्यांची मुलं आपला जीव अर्पण करतात, त्यांच्यासाठी दिल्लीच्या सीमेवर खिळे अंथरले आहेत. अन्नदाता अधिकार मागत आहे, सरकार अत्याचार करत आहे!"
"मोदी सरकार आयकर विभाग, ED आणि CBI ला आपल्या बोटांवर नाचवतं", राहुल गांधींचा गंभीर आरोप
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच, केंद्र सरकारला कुठल्याही परिस्थितीत लागू केलेले तीनही कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, असे म्हटले होते. गुरुवारी राहुल यांनी ट्विट केले होते, की "जे लोक धान्य पेरून धैर्याने पिकाची वाट पाहतात, महिन्यांची प्रतीक्षा आणि खराब हवामानालाही ते घाबरत नहीत! तिन्ही कायदे मागे घ्यावेच लागतील!"
केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या 26 नोव्हेंबरपासून हे शेतकरी आंदोलक दिल्लीच्या सीमेवर वेग-वेगळ्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. केंद्राणे आणलेले तीनही कृषी कायदे मागे घेण्यात यावेत, अशी या आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. याशिवाय किमान आधारभूत किंमतीसंदर्भातही कायदा करण्यात यावा, अशी मागणीही या शेतकऱ्यांनी केली आहे. आज हे शेतकरी आंदोलक काळा दिवस पाळत आहेत.
"प्रियंका कधी मंदिरात जातात, तर कधी क्रॉस घालून फिरतात आणि राहुल गांधी...; दोघेही बहुरुपी"
शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर मोदी सरकारने घातल्या धाडी -फँटम फिल्म्स या चित्रपट निर्मिती संस्थेने केलेल्या कथित करचोरीप्रकरणी प्राप्तिकर खात्याने अनुराग कश्यप, तापसी पन्नू आदींच्या मुंबई, पुण्यातील घरे व कार्यालयांवर 30 ठिकाणी बुधवारी धाडी घातल्या. यावरून, मोदी प्राप्तिकर खात्याला आपल्या इशाऱ्यांवर नाचवत आहेत. प्रसारमाध्यमांवरही मोदी सरकारचा मोठा दबाव आहे. नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर केंद्र सरकार धाडी घालत आहे, असेही राहुल गांधींनी म्हटले होते.