नवी दिल्ली- मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्तावावर चीननं नकाराधिकारा(विटोचा)चा वापर केल्यानंतर भारतातल्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारताला हा मोठा धक्का बसला असतानाच विरोधकांनीही या मुद्द्यावरून मोदींना लक्ष्य केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगना घाबरतात. चीन जेव्हा जेव्हा भारताविरोधात एखादा निर्णय घेतो, त्यावेळी मोदी काहीही बोलत नाहीत.राहुल गांधींनी मोदींच्या चीन धोरणावरही सडकून टीका केली आहे. मोदी शी जिनपिंग यांच्याबरोबर झोके घेतात, दिल्लीत त्यांची गळाभेट घेतात, चीनमध्येही त्यांच्यासमोर झुकतात, असं म्हणत राहुल यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रक्रियेमध्ये चीननं नकाराधिकाराचा वापर केल्यानंतर काँग्रेसनं मोदींना धारेवर धरलं आहे. मोदींनी परराष्ट्र नीती म्हणजे 'कूटनीतीला अपवाद' असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते सुरजेवाला यांनी ट्विट करत चीन आणि पाकिस्तानवर टीका केली आहे.
मसूद प्रकरणावर राहुल भडकले, म्हणे, जिनपिंगना मोदी घाबरतात, आता गप्प का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 11:51 AM