नवी दिल्ली - राफेल विमान करारावरून मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करत असलेल्या राहुल गांधी यांनी या कराराबात आज मोठा दावा केला आहे. राफेल करार हा जागतिक भ्रष्टाचार असून, येत्या काळात राफेल करारावरून काही मोठे गौप्यस्फोट होतील असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर एका वृत्तपत्रातील बातमीचा हवाला देऊन सांगितले की, राफेल करार हा एक जागतिक भ्रष्टाचार आहे. हे राफेल विमान वास्तवामध्ये खूप दूर आणि वेगाने उडते. येत्या काही आठवड्यामध्ये हे विमान काही बंकरभेदी बाँम्ब टाकणार आहे. मोदीजी तुम्ही अनिल अंबानींना सांगा की फ्रान्समध्ये एक मोठी समस्या आहे."असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याबाबत राहुल गांधी यांनी एक वृत्त शेअर केले आहे. यामध्ये राफेल विमान कराराबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी अनिल अंबानी यांच्या मनोरंजन कंपनीने फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद यांच्या भागीदाराला चित्रपट निर्मितीमध्ये मदत केल्याचा दावा केला होता.
राफेल कराराबाबत लवकरच होणार मोठे गौप्यस्फोट, राहुल गांधींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 12:59 PM