“मोदीजी… हेट इन इंडिया आणि मेक इन इंडिया दोन्ही सोबत राहू शकत नाहीत”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 01:30 PM2022-04-27T13:30:47+5:302022-04-27T13:31:53+5:30
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी काही जागतिक ब्रँड्सनं भारतातून काढता पाय घेतला यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला. मेक इन इंडिया आणि हेट इन इंडिया सोबत राहू शकत नाहीत, असं म्हणत त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला. तसंच त्यांनी देशात वाढत असलेल्या बेरोजगारीवरूनही निशाणा साधत विनाशकारी बेरोजगारी संकट असा उल्लेख करत त्यावर लक्ष देण्याची आवाहनही केलं.
“भारतात ज्या कंपन्या काम करत होत्या त्या बाहेर निघून गेल्या. ७ जागतिक ब्रँड, ९ फॅक्ट्रीज, ६४९ डिलरशीप, ८४ हजार नोकऱ्या,” असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं. मोदीजी हेट इन इंडिया आणि मेक इन इंडिया सोबत राहू शकत नाही. याशिवाय भारतातील विनाशकारी बेरोजगारी संकटावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. याशिवाय त्यांनी ट्विटरवर काही जागतिक ब्रँड्सचे फोटोही शेअर केले आहे. यात २०१७ मध्ये शेवरले, २०१८ मध्ये ट्रक्स, २०१९ फिएट आणि युनायटेड मोटर्स, २०२० मध्ये हार्ले डेविडसन, २०२१ मध्ये फोर्ड आणि २०२२ डॅटसन सारख्या कंपनींचे फोटो दाखवण्यात आले आहेत.
The ease of driving business out of India.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 27, 2022
❌ 7 Global Brands
❌ 9 Factories
❌ 649 Dealerships
❌ 84,000 Jobs
Modi ji, Hate-in-India and Make-in-India can’t coexist!
Time to focus on India's devastating unemployment crisis instead. pic.twitter.com/uXSOll4ndD
यापूर्वी मंगळवारीही राहुल गांघी यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे ४५ कोटींपेक्षा अधिक लोकांनी नोकरी मिळवण्याची अपेक्षा गमावली असल्याचा आरोप त्यांनी केला. असं करणारे ७५ वर्षांमधील ते पहिले पंतप्रधआन आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले. “नव्या भारताची घोषणा, प्रत्येक घरात बेरोजगारी. ७५ वर्षांमधील मोदी हे पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे ४५ कोटीपेक्षा अधिक लोकांनी नोकरी मिळवण्याची अपेक्षा गमावली आहे,” असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं होतं.