काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी काही जागतिक ब्रँड्सनं भारतातून काढता पाय घेतला यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला. मेक इन इंडिया आणि हेट इन इंडिया सोबत राहू शकत नाहीत, असं म्हणत त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला. तसंच त्यांनी देशात वाढत असलेल्या बेरोजगारीवरूनही निशाणा साधत विनाशकारी बेरोजगारी संकट असा उल्लेख करत त्यावर लक्ष देण्याची आवाहनही केलं.
“भारतात ज्या कंपन्या काम करत होत्या त्या बाहेर निघून गेल्या. ७ जागतिक ब्रँड, ९ फॅक्ट्रीज, ६४९ डिलरशीप, ८४ हजार नोकऱ्या,” असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं. मोदीजी हेट इन इंडिया आणि मेक इन इंडिया सोबत राहू शकत नाही. याशिवाय भारतातील विनाशकारी बेरोजगारी संकटावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. याशिवाय त्यांनी ट्विटरवर काही जागतिक ब्रँड्सचे फोटोही शेअर केले आहे. यात २०१७ मध्ये शेवरले, २०१८ मध्ये ट्रक्स, २०१९ फिएट आणि युनायटेड मोटर्स, २०२० मध्ये हार्ले डेविडसन, २०२१ मध्ये फोर्ड आणि २०२२ डॅटसन सारख्या कंपनींचे फोटो दाखवण्यात आले आहेत.