- हरिश गुप्ताअमेठी : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीमध्ये पराभव व्हावा म्हणून भाजपने जंगजंग पछाडले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ व पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या प्रचारसभा या मतदारसंघात झाल्या. पण भाजपच्या या डावपेचांवर मात करण्यात राहुल गांधी यशस्वी झाले आहेत.अमेठीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या स्मृती इराणी लढत आहेत. इराणी यांना उत्तर प्रदेशच्या सरकारी यंत्रणेचेही मोठे पाठबळ लाभले आहे. भाजपव्यतिरिक्त इतर पक्षांच्या लखनौऊ वा अन्य राज्यांतून आलेल्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे.‘चौकीदार चोर है' असा घणाघात राहुल गांधी यांनी केल्यामुळे त्यांच्यावर नरेंद्र मोदी संतापले आहेत. या प्रचारामुळे भाजप चिंताग्रस्तही झाला आहे. गुजरात विधानसभेत काँग्रेसला सत्ता मिळता मिळता राहिली. मध्य प्रदेश, राजस्थान, विधानसभेत काँग्रेसने भाजपचा पराभव केला. राहुल यांनी कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण केला तर प्रियांका यांनीही प्रचारात चैतन्यही आणले.अमेठीबरोबरच राहुल यांनी केरळच्या वायनाडमधूनही अर्ज भरुन त्यांना हरविण्याचे भाजपचे डावपेच उधळून लावले. प्रियांका यांनी अमेठीत पाच दिवसांच्या दौरा करून मोदी सरकारवर कडक टीका केली. राहुल यांनीही अमेठीचा पाच दिवसांचा दौरा केला. याआधी गांधी घराण्यातील कोणाही व्यक्तीने निवडणूक काळात एकाच मतदारसंघात इतक्या दिवसांचा दौरा केला नव्हता.
अमेठीत कोंडी करण्याचे भाजपचे डावपेच राहुल गांधींनी उधळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 06:00 IST