राहुल गांधी यांनी मराठीतून ट्विट करत शिवाजी महाराजांना केले अभिवादन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 03:16 PM2019-02-19T15:16:47+5:302019-02-19T15:18:02+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.
मुंबई - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आहे. विशेष बाब म्हणजे राहुल गांधी यांनी मराठीमधून ट्विट करत शिवरायांना नमन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणाऱ्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात, ''छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. सर्व समाजातील मावळे एकत्रित करून त्यांनी स्वराज्य उभारलं आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांचं जीवन आणि राज्य कारभार जगासाठी अनुकरणीय आहे. या महान राजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. सर्व समाजातील मावळे एकत्रित करून त्यांनी स्वराज्य उभारलं आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांचं जीवन आणि राज्य कारभार जगासाठी अनुकरणीय आहे. या महान राजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.#शिवाजीमहाराजकिजय
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 19, 2019