नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोरोना व्हायरस, लॉकडाऊन यासह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. 'मोदी मेड डिझास्टर' म्हणजेच मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटं असं म्हणत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
राहुल गांधी यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या संकटांमुळे देश अडचणीत असल्याचं म्हटलं आहे. या सोबत सहा मुद्दे सांगितले आहेत. 23.9 टक्क्यांनी घटलेला जीडीपीचा दर, 45 वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारीचा दर, 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, केंद्र सरकारने राज्यांना जीएसटीची रक्कम न देणे, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणि मृत्यूमध्ये दररोज होणारी वाढ आणि भारताच्या सीमावर शेजारच्या देश करत असलेली घुसखोरी या गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे.
केंद्रीय मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जून या तिमाहिचे आकडे जाहीर केले आहेत. मंत्रालयाच्या आकड्यांनुसार पहिल्या तिमाहीत स्थिर किंमतीवर म्हणजेच रियल जीडीपी 26.90 लाख कोटी रुपये राहिली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत ही जीडीपी 35.35 लाख कोटी रुपये होती. अशाप्रकारे यामध्ये 23.9 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी जीडीपीमध्ये 5.2 टक्क्यांची वाढ झाली होती. देशात लॉकडाऊन असल्याने एप्रिल आणि मे महिन्यात सारे काही बंद होते. यामुळे अर्थव्यवस्थाच ठप्प झाली होती. जूनमध्ये याला थोडा वेग आला होता. यामुळे रेटिंग एजन्सी आणि अर्थतज्ज्ञांनी जून तिमाहीमध्ये जीडीपीदरात 16 ते 25 टक्के घट होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला होता.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांच्या 'मन की बात'वर राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला होता. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रविवारी (30 ऑगस्ट) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. "पंतप्रधानांनी परीक्षेवर चर्चा करावी असं जेईई-नीटच्या परीक्षार्थींना वाटत होतं. मात्र, पंतप्रधानांनी 'खेळण्यांवर चर्चा' केली" असं म्हटलं. यासोबतच Mann_Ki_Nahi_Students_Ki_Baat हा हॅशटॅग देखील वापरला होता.
महत्त्वाच्या बातम्या
माणुसकीला काळीमा! शुद्धीकरणासाठी तरुणीला केलं निर्वस्त्र, 400 लोकांसमोर घातली आंघोळ
शाब्बास पोरी! जखमी झाली तरी नेटाने लढली, 15 वर्षीय मुलीने चोरांना चांगलीच अद्दल घडवली
कडक सॅल्यूट! 25 किमी तब्बल 8 तास पायी प्रवास करून ITBP जवानांनी कुटुंबीयांपर्यंत पोहोचवला मृतदेह
'मी राष्ट्रवादीचा आमदार' असं म्हणत रोहित पवारांनी केला 'या' संघटनेला विरोध
एकापेक्षा जास्त बँक खाती असणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण