नवी दिल्ली: देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरवर कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू आणि अर्थव्यवस्थेचा ग्राफ शेअर केला आहे. याचबरोबर, "अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार", हे या लॉकडाऊनने दाखवून दिल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, "अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार" हे वाक्य महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाइन यांचे आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
दोन दिवसांपूर्वीही राहुल गांधी यांनी काही तरी नवे घडेल या आशेने तोच तो वेडेपणा पुन्हा केला जातोय, असे ट्विट करत कोरोना महामारी हाताळण्याच्या सरकारी धोरणावर टीका केली होती. गेल्या शनिवारी देशव्यापी ‘लॉकडाऊन’च्या चार टप्प्यांमध्ये कोरोना रुग्णांची व मृत्यूंची संख्या कशी सतत वाढत गेली हे दाखविणारे तक्तेही राहुल गांधी यांनी या ट्विटसोबत प्रसिद्ध केले होते.
दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आळा घाल्यासाठी सरकार युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ११ हजार ५०२ नवे रुग्ण आढळले. तर ३२५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. चिंताजनक म्हणजे भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ३२ हजार ४२४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत तब्बल ९ हजार ५२० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आणखी बातम्या....
"हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे", आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया
मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओत छेडछाड, दिग्विजय सिंह यांच्यासह १२ जणांविरोधात एफआयआर दाखल
CoronaVirus News : अमित शहा 'अॅक्शन मोड'मध्ये, आज बोलविली सर्वपक्षीय बैठक
'आत्मनिर्भर पॅकेज' परिपूर्ण नाही; पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारांकडूनच प्रश्नचिन्ह