मोदींचं 2 कोटी नोकऱ्याचं आश्वासन अन् 14 कोटी लोकांना बेरोजगार केले, राहुल गांधींचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 03:15 PM2020-08-09T15:15:41+5:302020-08-09T15:15:58+5:30
नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळेच 14 कोटी तरुण बेरोजगार झाले आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं आहे. राहुल गांधींनी आता बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला आहे. 9 ऑगस्ट रोजी युवा कॉंग्रेस स्थापना दिनानिमित्त राहुल गांधी यांनी बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. ट्विटरवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणाले, 'नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी देशातील तरुणांना वचन दिले होते की, 2 कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून मिळेल. प्रत्येक वर्षी एक मोठे स्वप्न दाखवले. पण अखेर सत्य बाहेर आलेच. नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळेच 14 कोटी तरुण बेरोजगार झाले आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.
राहुल गांधी म्हणतात, हे का झालं, तर चुकीच्या धोरणांमुळेच झाले. नोटाबंदी, चुकीचा जीएसटी आणि नंतर लॉकडाऊन केलं. या तिन्ही घटकांनी भारताची रचना, आर्थिक संरचना नष्ट केली. आता सत्य हे आहे की, भारत यापुढे मोदी सरकार तरुणांना रोजगार देऊ शकत नाही. म्हणूनच युवक कॉंग्रेस मैदानात उतरत आहे.
राहुल गांधी म्हणाले की, युवक कॉंग्रेस प्रत्येक शहरात, प्रत्येक रस्त्यावर हा मुद्दा उपस्थित करणार आहे, याचा मला आनंद आहे. युवक कॉंग्रेस बेरोजगारीचा मुद्दा लावून धरणार आहे. राहुल गांधींनी लोकांना आवाहन केले आहे की, तुम्ही सर्वांनी 'रोजगार दो' मोहिमेमध्ये सामील व्हा आणि देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी युवक कॉंग्रेसबरोबर काम करावे.
आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तत्पूर्वी राहुल गांधी यांनी ट्विट केले होते की, 'आदिवासी समाजातील जीवनशैलीत निसर्गावर विश्वास, प्रेम आणि आदर आहे, जेणेकरून संपूर्ण जग संरक्षण आणि एकत्र राहण्यास शिकेल. आपल्या सर्वांनी एकत्रितपणे या सांस्कृतिक वारशाची जपणूक केली पाहिजे. जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.