'राहुल गांधी खूप हॅण्डसम', 107 वर्षांची आजी आहे फॅन नंबर वन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 10:22 AM2017-12-26T10:22:34+5:302017-12-26T10:26:13+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ख्रिसमसच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी नवी चाहती मिळाली आहे.

'Rahul Gandhi is very handsome', 107-year-old grandmother, Fan Number One | 'राहुल गांधी खूप हॅण्डसम', 107 वर्षांची आजी आहे फॅन नंबर वन

'राहुल गांधी खूप हॅण्डसम', 107 वर्षांची आजी आहे फॅन नंबर वन

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ख्रिसमसच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी नवी चाहती मिळाली आहे. राहुल गांधी यांची ही चाहती कोणी तरूणी नसून तब्बल 107 वर्षांची वृद्ध महिला आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ख्रिसमसच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी नवी चाहती मिळाली आहे. राहुल गांधीची ही चाहती त्यांची स्तुती करताना थकत नाही तसंच राहुल गांधी यांना भेटण्याचीही त्यांना इच्छा आहे. राहुल गांधी यांची ही चाहती कोणी तरूणी नसून तब्बल 107 वर्षांची वृद्ध महिला आहे.  ख्रिसमसच्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. त्याच दिवशी त्यांनी राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. 



 

राहुल गांधी यांची फॅन असणाऱ्या या आजींच्या नातीने 25 डिसेंबरला राहुल गांधी यांना टॅग करत ट्विट केलं. त्यामध्ये ही संपूर्ण माहिती दिली आहे. दीपाली सिकंद असं आजीच्या नाव असून तिने ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, आज माझी आजी 107 वर्षांची झाली. राहुल गांधी यांना भेटण्याची आजीची इच्छा आहे. मी त्यांना विचारल का राहुल गांधींना भेटायचं ? तर आजी आनंदाने म्हणाली, राहुल गांधी खूप हॅण्डसम आहेत. दीपाली सिकंदने आजीचा फोटो शेअर करत ट्विट केलं आहे.



 

दीपाली सिकंदच्या ट्विटला राहुल गांधी यांनी उत्तर दिलं आहे. डिअर दीपाली तुमच्या सुंदर आजीला वाढदिवसाच्या आणि ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा. त्यांना माझ्याकडून गळाभेट द्या, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं. दीपाली सिकंद यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. राहुल गांधी यांनी माझ्या आजीला व्यक्तिगत रूपात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हिचं खरी माणूसकी आहे. खूप धन्यवाद. असं दीपालीने ट्विटमध्ये म्हंटलं आहे. 



 

Web Title: 'Rahul Gandhi is very handsome', 107-year-old grandmother, Fan Number One

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.