1984च्या दंगलीदरम्यान राहुल गांधी शाळेत होते, त्यांना जबाबदार धरणं चूकच- अमरिंदर सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 09:35 PM2018-08-26T21:35:31+5:302018-08-26T22:04:06+5:30
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
चंदीगड- पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 1984च्या दंगलीच्या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर आरोप करणं चुकीचं आहे, असं अमरिंदर सिंग म्हणाले आहेत. 1984च्या शीख दंगलीत राहुल गांधी भागीदार होते, असा आरोप सुखबीर सिंग बादल यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना अमरिंदर सिंग यांनी अकाली दलावर जोरदार हल्लाबोल केला.
ऑपरेशन ब्लू स्टारच्या दरम्यान राहुल गांधी शाळेमध्ये शिक्षणाचे धडे गिरवत होते. त्यामुळे राहुल गांधींना आरोपी ठरवणं योग्य नाही. ज्यावेळी राहुल गांधींना याबाबत समज नव्हती, त्या घटनेसाठी त्यांना जबाबदार धरणं अयोग्य आहे. दंगलीतल्या आरोपींवर कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे, असंही अमरिंदर सिंग म्हणालेत. राहुल गांधींनी 1984च्या दंगलीचा निषेध नोंदवला होता. काही लोकांच्या कृत्यासाठी एखाद्या पक्षाला जबाबदार धरणे मूर्खपणाचे ठरेल.
To hold Rahul (Gandhi) responsible for an act which he wasn't even aware of at the time it happened was completely ridiculous. Congress,as a party, was never involved in riots: Capt. Amarinder Singh on Sukhbir Badal's reaction to R Gandhi's statement in UK on 1984 Anti-Sikh riots pic.twitter.com/OCj8cuos7Z
— ANI (@ANI) August 26, 2018
सुखबीर सिंग बादल यांचं हे विधान अज्ञानातून आले आहे, असंही अमरिंदर सिंग म्हणाले आहेत. आपचे नेते एच. एस. फुल्का यांनीही काँग्रेसला खुलं आव्हान दिलं आहे. शीख दंगलीत काँग्रेसचा सहभाग नसल्याचं राहुल गांधींचं विधान बेजबाबदारपणाचं आहे. राहुल यांनी या विषयावर आपल्याशी खुली चर्चा करावी, असंही आव्हानही फुल्का यांनी दिलं आहे. 1984ची शीख दंगल राजीव गांधींच्या इशाऱ्यामुळेच घडल्याचा आरोपही फुल्का यांनी केला आहे.