चंदीगड- पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 1984च्या दंगलीच्या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर आरोप करणं चुकीचं आहे, असं अमरिंदर सिंग म्हणाले आहेत. 1984च्या शीख दंगलीत राहुल गांधी भागीदार होते, असा आरोप सुखबीर सिंग बादल यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना अमरिंदर सिंग यांनी अकाली दलावर जोरदार हल्लाबोल केला.ऑपरेशन ब्लू स्टारच्या दरम्यान राहुल गांधी शाळेमध्ये शिक्षणाचे धडे गिरवत होते. त्यामुळे राहुल गांधींना आरोपी ठरवणं योग्य नाही. ज्यावेळी राहुल गांधींना याबाबत समज नव्हती, त्या घटनेसाठी त्यांना जबाबदार धरणं अयोग्य आहे. दंगलीतल्या आरोपींवर कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे, असंही अमरिंदर सिंग म्हणालेत. राहुल गांधींनी 1984च्या दंगलीचा निषेध नोंदवला होता. काही लोकांच्या कृत्यासाठी एखाद्या पक्षाला जबाबदार धरणे मूर्खपणाचे ठरेल.
1984च्या दंगलीदरम्यान राहुल गांधी शाळेत होते, त्यांना जबाबदार धरणं चूकच- अमरिंदर सिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 22:04 IST