Rahul Gandhi: ‘बायको अशी हवी!’ राहुल गांधींनी सांगितल्या अपेक्षा, ही आहे पहिली अट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 01:43 PM2023-01-22T13:43:27+5:302023-01-22T13:43:50+5:30
Bharat Jodo Yatra: आतापर्यंत अविवाहित असलेल्या राहुल गांधी यांच्या विवाहाबाबतही चर्चा सुरू असते. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत मोकळेपणाने माहिती दिली. तसेच भावी जीवनसाथीबाबतचे आपले विचारही मांडले.
नवी दिल्ली - भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या नेतृत्वाची जादू दाखवून दिली आहे. कन्याकुमारीपासून सुरू होऊन काश्मिरमध्ये पोहोचलेल्या या भारत जोडो यात्रेला देशभरातील जनतेकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत अविवाहित असलेल्या राहुल गांधी यांच्या विवाहाबाबतही चर्चा सुरू असते. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत मोकळेपणाने माहिती दिली. तसेच भावी जीवनसाथीबाबतचे आपले विचारही मांडले. ते म्हणाले की, जेव्हा कुणी योग्य मुलगी मिळेल, तेव्हा मी तिच्याशी लग्न करेन. मात्र त्यासाठी एक अट आहे ती म्हणजे ती मुलगी इंटेलिसेंज असली पाहिजे. माझ्या आई-वडिलांचा विवाह खूप सुंदर झाल होता. त्यामुळे लग्नाबाबतचे माझे विचार खूप उत्तुंग आहेत. मला अशाच जीवनसाथीची अपेक्षा आहे.
राहुल गांधी यांनी सांगितले की, भारत जोडो यात्रेमध्ये मी देशेतील संस्कृती आणि खानपान खूप जवळून पाहिले आहे. तेलंगाणासारख्या राज्यात मसालेदार भोजनाचा उपयोग अधिक होतो. तसेच संस्कृती केवळ राज्यांच्या सीमांवर नाही तर राज्यांच्या अंतर्गतही बदलत असते.
तसेच ते पुढे म्हणाले की, अधिक राग आल्यावर मी गप्प बसतो. माझ्या पक्षातील लोक कधीकधी माझ्यावर दबाव आणत असतात. मात्र मी त्याला स्पष्टपणे नकार देतो. भारत जोडो यात्रा ही एक तपस्या आहे. भारताच्या संस्कृतीमध्ये तपस्येला खूप महत्त्व आहे. त्यामुळे कुठल्याही कामामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या एकप्रकारे तपस्या आहेत. देशामध्ये लाखो लोक तपस्या करत आहेत, असेही ते पुढे म्हणाले.