नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी रेल्वे भरती बोर्ड-एनटीपीसी परीक्षेच्या (RRB NTPC Exam) नियम आणि निकालाविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणांना पाठिंबा देत सरकारवर निशाणा साधला. 'याला चांगले दिवस कोण म्हणतो?', असा सवाल त्यांनी केला.
राहुल गांधींनी एका तरुणाचा व्हिडिओ शेअर करत ट्विट केले की, 'विद्यार्थी बरोबर आहेत. त्यांची वेदना खरी आहे. कोण म्हणतं आजचे दिवस चांगले आहेत?" राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण म्हणतोय की, माझ्या महिन्याचा खर्च पाठवण्यासाठी त्याची आई आजारी असतानाही तिचे औषध घेत नाहीये. दरम्यान, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये आंदोलक तरुणांवर पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत काँग्रेस युवा आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
गुन्हे परत घेण्याची काँग्रेसची मागणीयावेळी भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी आरोप केला की, "नरेंद्र मोदी सरकार तरुणांवर केवळ नोकऱ्यांची मागणी करत असल्याने त्यांच्यावर अत्याचार करत आहे. सरकारने हे समजून घेतले पाहिजे की ते लाठीमार करून तरुणांचा आवाज दाबू शकत नाहीत. सरकारने विद्यार्थ्यांवरील खटले मागे घ्यावेत आणि संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली.
परीक्षा पुढे ढकलल्यादेशातील विविध भागांत झालेल्या आंदोलनानंतर रेल्वे मंत्रालयाने बुधवारी नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (RRB-NTPC) आणि लेव्हल 2 च्या परीक्षा पुढे ढकलल्या. परीक्षा दोन टप्प्यात घेण्याच्या रेल्वेच्या निर्णयाला उमेदवारांकडून विरोध होत आहे. त्यांचे म्हणणे आहे की अंतिम निवडीचा दुसरा टप्पा म्हणजे संगणक आधारित चाचणी (CBT) साठी RRB-NTPC च्या पहिल्या टप्प्यात उपस्थित आणि पात्र ठरलेल्यांची फसवणूक करण्यासारखे आहे.