Rahul Gandhi On Farmer Suicide: काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या कर्नाटकात आहे. भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून राहुल गांधी (Rahul Gandhi) अधिक सक्रिय झाले आहेत. या यात्रेत ते भाजपविरोधात अनेक मुद्दे मांडताना दिसत आहेत. राहुल यांनी आज (7 ऑक्टोबर) ट्विट करून शेतकरी आत्महत्येचा (Farmer Suicide) मुद्दा उपस्थित केला.
पुन्हा एकदा दोन भारतांचा उल्लेख करत, राहुल गांधी म्हणाले की, ''काल (6 ऑक्टोबर) मी एका महिलेला भेटलो. तिच्या शेतकरी पतीने 50,000 रुपयांच्या कर्जापाई आत्महत्या केली. एक भारत असा आहे, जिथे भांडवलदार मित्रांना 6 टक्के व्याजावर कर्ज आणि कोट्यवधींची कर्जमाफी दिली जाते. आणि दुसरा भारत असा आहे, ज्यात शेतकऱ्यांना 24 टक्के व्याजाने कर्ज आणि संकटांनी भरलेले आयुष्य आहे. या दोन भारताला आम्ही स्वीकारणार नाहीत."
राहुल गांधी गरीब बेरोजगारांना भेटलेकाँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी अनेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यापैकी बहुतांश गरीब आणि बेरोजगार लोकांचा समावेश आहे. यादरम्यान राहुल यांच्या भेटीचे अनेक फोटोही आले आहेत, ज्यांना पाहून लोक भावूक होत आहेत. अनेकजण राहुल गांधींना भेटून समस्या सांगत आहेत.
सोनिया गांधीही या यात्रेत सहभागी झाल्या होत्याकाँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 7 सप्टेंबर रोजी केरळमधून सुरुवात झाली. 30 सप्टेंबरला ही यात्रा कर्नाटकात पोहोचली. 21 ऑक्टोबरपर्यंत यात्रा राज्यात असणार आहे. दरम्यान, काल म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यात्रेत सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि कार्यकर्त्यांसोबत पायी प्रवास केला.