नवी दिल्ली - बिहारमधील मुझफ्फरपूर आणि आससापच्या परिसरात मेंदुज्वर (एईएस) या आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि लहान मुलांशी सवांद साधणार आहे.
बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये मेंदूज्वरामुळे आतापर्यंत १०८ मुलांचा मृत्यू झाला आहे. लहान मुलांसाठी यमदूत बनलेल्या या आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात सरकारला अपयश येत असल्याचे पहायला मिळत आहे. राहुल यांनी मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी होता यावं यामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आपल्या ४९ व्या वाढदिवसाला राहुल दिल्लीतील कॉंग्रेसच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेणार असून त्यांनतर लहान मुलांशी सवांद साधणार आहे.
राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० मध्ये झाला. राहुल हे पहिल्यांदा २००४ मध्ये अमेठीमधून खासदार म्हणून निवडून आले. त्यांनतर ही राहुल २००९ ते २००१४ ला पुन्हा अमेठीमधून खासदार झाले. परंतु २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठा धक्का त्यांना याच मतदार संघातून मिळाला. त्याच कारण,लोकसभा निवडणुकीत खासदार स्मृती ईराणी यांनी त्यांचा पराभव केला आहे.