शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

पाटण्यात राहुल गांधी दाखवणार काँग्रेसची ताकद, करणार रोड शो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2023 06:11 IST

विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर जाहीर सभा नाही; पण राेड शाे

हरिश गुप्ता

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार येत्या २३ जून रोजी पाटणा येथे काँग्रेससह १६ विरोधी पक्षांची बैठक घेण्याच्या तयारीला लागले आहेत. मात्र बैठकीनंतर विरोधी पक्षांची जाहीर सभा होणार नाही. त्याच दिवशी काँग्रेसतर्फे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांचा सहभाग असलेला भव्य रोड शो पाटणा येथे आयोजिण्याच्या हालचाली सुरू आहेत.

काँग्रेसच्या या दाेन नेत्यांचे पक्षाकडून पाटणा विमानतळावर जंगी स्वागत करण्यात येईल. त्यानंतर विमानतळ ते बिहार काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयापर्यंत भव्य रोड शोचे आयोजन करण्याचा काँग्रेसचा विचार आहे. त्याप्रसंगी या मार्गावर काँग्रेस सुमारे तीस भव्य स्वागत कमानी उभारणार आहे. रोड शोमध्ये बिहारमधील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील व रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या जनतेला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल हे नेते अभिवादन करतील, अशी योजना आहे.भाजपबरोबर जाण्यासाठी जीतनराम मांझी यांचा एचएएम हा पक्ष बिहार सरकारमधून बाहेर पडला. त्यामुळे विरोधी पक्षांची एकजूट साधण्याच्या नितीशकुमार यांच्या प्रयत्नांना तडा गेला आहे.

लहान पक्षांवर लक्ष

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, जनता दल (युनायटेड) या पक्षांमध्ये फूट पाडणे शक्य नसल्याने भाजपने छोट्या पक्षांवर आपले लक्ष केंद्रित केले. छोट्या पक्षांनी साथ सोडली तर नितीशकुमार यांच्यासोबत काँग्रेस, जनता दल (युनायटेड), लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, सीपीआय (एमएल), माकप, भाकप हे सहा पक्षच उरण्याची शक्यता आहे.

इतर पक्षांना आपल्याकडे वळविण्याचे भाजपचे प्रयत्न

  • बिहारमध्ये भाजप इतर पक्षांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोक जनता दल (आरएलजेडी) व मुकेश साहनी यांचा विकासशील इन्सान पक्ष (व्हीआयपी) भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. 
  • चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्षाशी (एलजेपी- रामविलास) देखील भाजपची चर्चा सुरू आहे. लोक जनशक्ती पक्षाचा पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखालील दुसरा गट याआधीच भाजपप्रणित एनडीएमध्ये सामील झाला आहे.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBiharबिहारcongressकाँग्रेसBJPभाजपा