शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला जाणार, परराष्ट्र मंत्रालयाने तारीख सांगितली
2
"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा"
3
ब्रिटनमध्ये ऋषी सुनक दारुण पराभवाच्या छायेत? सर्व्हे आला, आज मतदानाला सुरुवात
4
“कंपन्यांकडून लूट, पीकविम्याचे धोरण बदलून शेतकरी हिताचे करा, शिंदे सरकार...”: नाना पटोले
5
धीरेंद्र शास्त्रींचा जन्मोत्सव; शुभेच्छा देण्यासाठी बागेश्वर धाममध्ये लाखो भाविकांची गर्दी
6
Team India Arrival LIVE: टीम इंडियाची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी; रोहितसेनेचे 'हार्दिक' स्वागत!
7
अंबादास दानवेंना दिलासा, उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाबाबत महत्त्वाचा निर्णय
8
सेन्सेक्स पहिल्यांदा 80,000 पार; BSE मार्केट कॅप 447.43 लाख कोटींच्या पुढे...
9
"टीम इंडियाच्या स्वागताला गुजरातच्या बस कशासाठी?…हा महाराष्ट्राचा अपमान’’, आदित्य ठाकरे संतापले
10
हातरसच्या भोले बाबांची गुपिते उघड! भक्तांकडून एक पैसाही घेत नाहीत, पण प्रत्येक शहरात मालमत्ता, महागड्या गाड्या
11
शुभंकर तावडेने दिली प्रेमाची कबुली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत शेअर केला रोमँटिक फोटो
12
Video: माझी पंढरीची माय... वारकऱ्यांबरोबर रमला अभिनेता संदीप पाठक, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
13
रोहित शर्माच्या हातातील ट्रॉफी प्लॅटिनमची की चांदीची? खरी की रिप्लिका? मोठी माहिती समोर
14
'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालू खऱ्या आयुष्यात पण आहे प्रेमात, अभिनेत्रीने दिली ही हिंट
15
राहुल गांधी हाथरसला जाणार, चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार!
16
'तुमचे सर्व सामान परत करतो', आधी केली चोरी, मग पत्र लिहून चोराने मागितली माफी...
17
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान हार्दिकची पत्नी नताशाने शेअर केला व्हिडिओ, म्हणते- "मला तुम्हाला सांगायचं आहे की..."
18
वसंत मोरेंची मोठी घोषणा! या तारखेला शिवबंधन बांधणार; वंचित सोडण्याचे कारणही सांगितले...
19
हुतात्मा अग्निवीरांना आर्थिक मदत नाही, राहुल गांधींचा दावा लष्कराने फेटाळला, शहीद अग्निवीराचे वडील म्हणाले...  
20
"अदानीपासून मुंबईला वाचवा, जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा", विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

भाषणातून हटवलेले शब्द पाहून राहुल गांधी संतापले; सभापतींना पत्र लिहून सांगितले नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 2:24 PM

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातील टिप्पणी कामकाजात पूर्ववत ठेवावीत, अशी विनंती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्राद्वारे केली आहे.

नवी दिल्ली : संसदेच्या कामकाजाच्या सहाव्या दिवशी (1 जुलै) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पहिले भाषण केले. यावेळी राहुल गांधी यांनी नीट पेपरफुटी प्रकरण, अग्निवीर योजना आणि मणिपूर मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. दरम्यान, राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग हटवण्यात आला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. 

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातील टिप्पणी कामकाजात पूर्ववत ठेवावीत, अशी विनंती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्राद्वारे केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले, "माझ्या भाषणातील बराचसा भाग कामकाजातून काढून टाकण्यात आल्याने मला धक्का बसला आहे. हे संसदेच्या नियमांच्या विरोधात आहे." 

भाजप खासदार अनुराग ठाकूर यांचे भाषणही आरोपांनी भरलेले होते, मात्र त्यांच्या भाषणातून एकच शब्द काढण्यात आला. याबाबत केलेला भेदभाव समजण्यापलीकडचा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच, सभागृहात सत्य मांडले. संसदेत जनतेशी संबंधित प्रश्न मांडण्याचा अधिकार प्रत्येक खासदाराला आहे. हेच लक्षात घेऊन मी माझे भाषण दिले. नरेंद्र मोदींच्या जगात सत्य पुसले जाऊ शकते, परंतु वास्तवात नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी पत्र लिहिल्यामुळे भाजपने पलटवार केला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग काढून टाकण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या भाषणातील हिंदू आणि इतर काही धर्मांबद्दलच्या त्यांच्या टिप्पण्यांचा समावेश आहे. तसेच, नरेंद्र मोदी, आएसएस, भाजपवरचा भाग नोंदीतून काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसParliamentसंसदom birlaओम बिर्लाBJPभाजपा