ऑनलाइन लोकमत -
आसाम, दि. ५ - काही मोजक्या व्यवसायिकांसाठी सरकार चालवलं जात असल्याच आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. नागावमधील रॅलीमध्ये ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी खुप आश्वासनं दिली, हे करेन ते करेन बोलले, खुप मार्केटींग केली मात्र प्रत्यक्षात काहीचं केलं नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
जेएनयूमधील 8000 विद्यार्थ्यांपैकी 1000 विद्यार्थी ईशान्य भारतातील राज्यातून येतात. मात्र काही जणांच्या चुकीसाठी भारतातील 1000 विद्यार्थ्यांना शिक्षा दिली जात आहे. मोदींना संसदेत मी प्रश्न विचारले मात्र त्यांनी उत्तर न देता माझ्यावर वैयक्तिक हल्ला केला. मी जेएनयू, रोहीत वेमुला, मेक इन इंडियासंबधी मोदींना संसदेत प्रश्न विचारले होते. मोदींच्या विरोधात काहीच बोललो नव्हतो. नरेंद्र मोदी आपल्या एक तासाच्या भाषणात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) काहीच बोलले नाहीत असं राहुल गांधी बोलले आहेत.