- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : राहुल गांधी हे त्यांच्या सभांमध्ये जे आरोप करतात त्यावरून ते हास्यास्पद युवराज असल्याचे सिद्ध होत आहे, अशी टीका वित्तमंत्री अरुण जेटली यांनी फेसबुकवरील लिहिलेल्या ब्लॉगमध्ये केली आहे. मोदी सरकार १५ उद्योगपतींना दिलेली २.५ लाख कोटी रुपयांची कर्जे माफ करणार आहे, असा आरोप राहुल यांनी केला होता. जेटली यांनी म्हटले आहे की, देशातील कर्जबुडव्या १२ उद्योगपतींना २०१४ च्या आधी कर्जे मंजूर झालेली आहेत. या उद्योगपतींकडून ही देणी वसूल करण्याचे काम आता मोदी सरकार करीत आहे. राफेल, बुडीत खाती गेलेली कर्जे यांच्यासंदर्भात राहुल गांधी यांनी बिनबुडाचे आरोप केल्याचे सिद्ध झाले आहे.
राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे -अरुण जेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 4:33 AM