राहुल गांधी यांचा मोदींवर हल्लाबोल, रोड शोच्या माध्यमातून लोकांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 02:02 AM2017-09-26T02:02:57+5:302017-09-26T02:03:26+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या तीन दिवसीय गुजरात दौºयाची सुरुवात करताना नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
द्वारका : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या तीन दिवसीय गुजरात दौºयाची सुरुवात करताना नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. तर, मुख्यमंत्री असताना मोदी यांनी सुरू केलेल्या ‘गुजरात मॉडेल’वरही टीका केली.
या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राहुल गांधी यांनी सोमवारी येथे प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात पूजा केली. या वेळी रोड शोच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी लोकांशी संवाद साधला सौराष्ट्रात द्वारका - जामनगर मार्गावर ते बैलगाडीतही बसले. या वेळी अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत झाले.
पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी टिष्ट्वट करून राहुल गांधी यांचे स्वागत केले. राहुल म्हणाले की, गुजरातमध्ये भाजपा सरकारकडून खासगीकरण केले जात आहे. खासगीकरणामुळे गरिबांचा शिक्षण आणि आरोग्याचा अधिकार हिसकावून घेण्यात आला आहे. सरकार व्यापाºयांचे कर्ज माफ करू शकते, तर शेतकºयांचे का नाही?
पूर्वजांचे कर्तृत्व
राहुल गांधी म्हणाले की, गत ७० वर्षांत देशाने मोठी प्रगती केली आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा येथे चांगल्या शाळा, मोठे विद्यापीठ, कंपन्या नव्हत्या. पण, आज हे सर्व काही आहे ते केवळ तुमच्या आई-वडिलांच्या, आजी-आजोबांच्या मेहनतीमुळे, असेही ते म्हणाले.