हैदराबाद - नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आतापर्यंत एकदाही प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही. मोदींच्या प्रसारमाध्यमांपासून फटकून वागण्याच्या सवयीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली असून, मोदींना पंतप्रधान होऊन इतके दिवस लोटले आहेत. आतातरी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जाण्याचा आनंद लुटावा, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले आहे. राजस्थान आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रसारमाध्यमांशी संवाद न साधण्यावरून टोला लगावला. हैदराबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य करणारे एक ट्विट केले. त्यात ते म्हणाले की,'' प्रिय मोदीजी, आता निवडणुकीचा प्रचार संपला आहे. आता तुम्हाला पंतप्रधानपदाच्या पार्ट टाइम कमासाठी वेळ मिळेल,अशी अपेक्षा करतो. तुम्हाला पंतप्रधान होऊन 1 हजार 654 दिवस झालेत पण आतापर्यंत तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली नाही. हैदराबाद येथील माझ्या पत्रकार परिषदेची काही छायाचित्रे मी तुमच्यासाठी शेअर करत आहे. एखाद दिवस प्रयत्न करा, प्रश्नांच्या सरबत्तीचा सामना करणे मजेशीर असते,'' असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
प्रधानमंत्रीजी एकदा तरी पत्रकार परिषदेत बोला, राहुल गांधींचे मोदींना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 9:21 AM
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आतापर्यंत एकदाही प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही. मोदींच्या प्रसारमाध्यमांपासून फटकून वागण्याच्या सवयीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली
ठळक मुद्दे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आतापर्यंत एकदाही प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही.मोदींच्या प्रसारमाध्यमांपासून फटकून वागण्याच्या सवयीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार टीका केलीमोदींना पंतप्रधान होऊन इतके दिवस लोटले आहेत. आतातरी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जाण्याचा आनंद लुटावा, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले