नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल, नोटबंदी आणि नीरव मोदी या प्रकरणांवर माझ्याशी खुली चर्चा करावी असं आव्हान दिलं आहे. मंगळवारी राहुल गांधी यांनी ट्विट करत या मुद्द्यावंर पंतप्रधानांनी अभ्यास करुन पूर्ण तयारी झाल्यावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी यावं. मात्र नरेंद्र मोदी माझ्याशी चर्चा करण्याची भिती आहे असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, नरेंद्र मोदीजी, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तुम्ही माझ्याशी चर्चा करण्यास घाबरता का? मी तुमच्यासाठी हे सोप्प करुन देतो. पुस्तके उघडून तुम्ही खालील विषयांवर चर्चेची तयारी करा. पहिलं -राफेल आणि अनिल अंबानी, दुसरं - नीरव मोदी आणि तिसरं अमित शहा आणि नोटाबंदी या मुद्द्यांवर चर्चा करण्याचं आव्हान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.
तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'बंद दाराआड तयार करण्यात आलेल्या भाजपाच्या संकल्पपत्रात दूरदृष्टीचा अभाव असून हे संकल्पपत्र अहंकाराने भरलेलं आहे,' अशी टीका केली होती. मंगळवारी सकाळी ट्वीट करून भाजपावर निशाणा साधला. 'काँग्रेसचा जाहीरनामा मोठ्या चर्चेनंतर तयार करण्यात आला आहे. 10 लाखांहून अधिक भारतीय नागरिकांच्या मतांचा यामध्ये समावेश केला आहे. हा अत्यंत प्रभावशाली दस्तऐवज आहे.’ असे ट्वीट त्यांनी केले होते. तसेच भाजपाचा निवडणूक जाहीरनामा हा बंद दाराआड तयार करण्यात आला आहे. एकांगी विचाराने हा जाहीरनामा प्रेरित आहे. त्यात दूरदृष्टीचा अभाव असून अहंकाराने भरलेला हा जाहीरनामा असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली होती.
यावर एकीकडे आमचा सशक्त भारत बनविण्याचा संकल्प आहे तर दुसरीकडे काँग्रेसचं देशविरोधी घोषणापत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथे झालेल्या सभेत काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे काँग्रेसचं ढकोसलापत्र आहे. जे पाकिस्तानला हवं तेच या जाहीरनाम्यात लिहिलं आहे अशी टीका केली
काँग्रेसची 'न्याय' योजना म्हणजे 60 वर्षांतील अन्यायाचा कबुलीनामा; नरेंद्र मोदींची चपराक