शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
4
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
5
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
6
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
7
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
8
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
10
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
11
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
12
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
13
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
14
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
15
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
16
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
17
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
18
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
19
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
20
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

लालकृष्ण अडवाणींना जोडे मारून भाजपाच्या स्टेजवरून उतरवले, राहुल गांधींची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 6:29 PM

भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा अवमान होत असल्याची चर्चा सुरू असतानाच आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.

चंद्रपूर - भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा अवमान होत असल्याची चर्चा सुरू असतानाच आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. सध्याच्या भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा आदर केला जात नाही. मोदी आणि अडवाणींचे नाते गुरु शिष्याचे आहे. मात्र मोदींनी त्यांना डावलले. लालकृष्ण अडवाणी यांना अपमानित करून जोडे मारून भाजपाच्या स्टेजवरून उतरवण्यात आले, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपा नेतृत्वाकडून अनेक ज्येष्ठ नेत्यांना वाढत्या वयाचे कारण देऊन उमेदवारी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी गुरुवाली ब्लॉग लिहून पक्षातील सध्याच्या घडामोडींविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्याचा धागा पकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज चंद्रपूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. '' हिंदू धर्मात गुरुचे स्थान फार मोठे असते. मात्र नरेंद्र  मोदींना आपल्या गुरुलाच डावलले आहे आणि आता ते आम्हाल हिंदू धर्म शिकवू पाहत आहेत.'' असे राहुल गांधी म्हणाले.''मोदींच्या काळात लालकृष्ण अडवाणी यांना भाजपामध्ये अपमानित करण्यात  आले. त्यांना जोडे मारून स्टेजवरून उतरवण्यात आले .'' असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, मोदींच्या  आर्थिक धोरणांवरही राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली. मोदींनी ५ वर्षात देशातील १५ लोकांना लाखो कोटी रुपये दिले मात्र विदर्भातील शेतकऱ्यांना माफी दिली नाही. मला सांगा, शेतकरी किंवा मजुराच्या घरासमोर चौकीदार असतो काय? तर तो नसतो. तो असतो कोट्यवधी रुपये ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या घरासमोर. पुलवामा हल्ल्याच्या दिवशी मोदींनी अदानीला ६ विमानतळ दिले. या मोदींनी फक्त श्रीमंतांचीच चौकीदार केली आहे, असे घणाघाती आरोप करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी काँग्रेसला निवडून देण्याचे व स्थिर सरकार आणण्याचे आवाहन येथील मतदारांना केले.देशात पैशाची कमी नाही. जनतेला संभ्रमित केले जात आहे. शेतकरी आणि मजुरांना देण्यासाठी पैशाची कमी आहे पण अंबानींसाठी ती कमी नाही. गरीबांना देत नसाल तर मग उद्योगपतींनाही पैसे देऊ नका. मेक इन इंडिया म्हटले पण देशात व्यापार ठप्प झाला आहे. सगळा चायना माल येथे येतो आहे. नोटबंदीला १२ वर्षांच्या मुलानेही नकार दिला असता. पण ती गोष्ट मोदींना कळली नाही. महागाई वाढते आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही निवडणुकांनंतर ट्रॅक्स प्रणाली सरळ करू. शेतकºयांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करू असे आश्वासन राहूल गांधी यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019chandrapur-pcचंद्रपूरcongressकाँग्रेसBJPभाजपाLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणी