अमेठीच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने झाला राहुल गांधींचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 04:29 AM2019-05-28T04:29:45+5:302019-05-28T04:30:09+5:30
गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ अमेठीच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने राहुल गांधी यांंच्याबद्दल स्थानिक मतदारांच्या मनात रोष होता.
अमेठी : गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ अमेठीच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने राहुल गांधी यांंच्याबद्दल स्थानिक मतदारांच्या मनात रोष होता. त्यामुळेच अमेठीमध्ये त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, असे दिसत आहे. भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा ५५ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. राहुल येथून २००४पासून सलग तीनदा विजयी झाले. त्याआधी अमेठीतून सोनिया गांधी, राजीव गांधी, संजय गांधी यांनीही निवडणूक लढविली होती.
अमेठीतील एक दुकानदार म्हणाला की, माझ्या कुटुंबात फक्त मीच यंदा काँग्रेसला मतदान केले. मात्र अमेठीचा विकास करण्याचे आश्वासन राहुल पूर्ण करू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तर मुन्शीगंज भागातील दुकानदाराने सांगितले की, राहुल गांधी यांना धडा शिकविणे आवश्यक होते. त्यांनी मतदारांना गृहीत धरले होते. मात्र या वेळी स्मृती इराणी जिंकणार हे जाणवत होते.
विकासासाठी दिले मत
एकू दूधविक्रेता म्हणाला की, २०१४ साली मी राहुल गांधी यांनाच मत दिले होते. पण यंदा विकासासाठी काम करणाऱ्यांना मत दिले आहे. स्मृती इराणींनी अमेठीतील काही कारखानेही सुरू केले. त्या इथे सातत्याने येत होत्या. पण राहुल गांधी इथे फिरकलेही नाहीत.