नवी दिल्ली- फेसबुक डेटा लीकप्रकरणी आता भारतात जोरदार राजकीय उलथापालथी होऊ लागल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही या वादात उडी घेतली आहे. राहुल गांधींनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले, इराकमध्ये 39 भारतीयांच्या झालेल्या हत्येवरून लक्ष विचलित करण्यासाठीच फेसबुकच्या डेटा लीकची गोष्ट समोर आणली गेली आहे.इराकमध्ये 39 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. सरकारचा खोटेपणा उघड झाल्यानं ते अडचणीत सापडले आहेत. सरकारनं यातून स्वतःचा बचाव करायचा असल्यानं काँग्रेसचा फेसबुक डेटा लीक प्रकरणात हात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये 5 कोटी लोकांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या आरोपामुळे फेसबुक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
फेसबुकच्या वादात राहुल गांधींची उडी, ट्विट करत मोदींवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 1:28 PM