'तुम्ही माझ्या विचारांना कैद करू शकत नाही', 'त्या' वक्तव्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 04:25 PM2021-12-27T16:25:06+5:302021-12-27T16:25:18+5:30

रायपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींविरोधात अवमानजनक वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच प्रकरणावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Rahul Gandhi's reaction after kalicharan maharaj's statement on mahatma gandhi | 'तुम्ही माझ्या विचारांना कैद करू शकत नाही', 'त्या' वक्तव्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

'तुम्ही माझ्या विचारांना कैद करू शकत नाही', 'त्या' वक्तव्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

Next

नवी दिल्ली: छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान अकोल्यातील कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींविरोधात ( Mahatma Gandhi) अवमानजनक वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक नेत्यांकडून कालीचरण महाराजांवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी होत आहे. याच प्रकरणावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रविवारी रायपूरमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान धर्मगुरूंच्या एका गटाने महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे कौतुक केल्याच्या घटनेवर राहुल गांधी यांनी महात्मा गांधींचे एक वाक्य ट्विट केले "तुम्ही मला बेड्या घालू शकता, माझा छळ करू शकता, या शरीराचा नाश करू शकता, परंतु तुम्ही माझ्या विचारांना कधीही कैद करू शकत नाही." अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केले.

कालीचरण महाराज काय म्हणाले?

रायपूरमधील रावणभथ मैदानावर दोन दिवसीय 'धर्म संसद'च्या शेवटच्या दिवशी हिंदू धर्मगुरू कालीचरण महाराज यांनी आपल्या भाषणात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केली. यावेळी त्यांनी खालच्या दर्जाचे शब्दही वापरले. कालीचरण महाराज हे फक्त गांधीजींना शिविगाळ करुन थांबले नाहीत तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचेही त्यांनी आभार मानले आहेत. तसेच, धर्माच्या रक्षणासाठी कट्टर हिंदू नेत्यालाच सरकारचा प्रमुख म्हणून निवडावे, असे ते म्हणाले. त्यापूर्वी यती नरसिंहानंद गिरी यांनीही गोडसे हे सत्य आणि धर्माचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार काढले होते.

हिंदू धर्मगुरू आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल
छत्तीसगड पोलिसांनी हिंदू धर्मगुरू कालीचरण महाराज आणि इतरांविरुद्ध महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल आणि नथुराम गोडसेची प्रशंसा केल्याबद्दल एफआयआर नोंदवला आहे. रायपूरचे माजी महापौर आणि काँग्रेस नेते प्रमोद दुबे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी टिकरापारा पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 505(2), 294 अन्वये एफआयआर नोंदवला आहे.

Web Title: Rahul Gandhi's reaction after kalicharan maharaj's statement on mahatma gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.