संबित पात्रांकडून राहुल गांधींची खिल्ली, ट्विटरवर नेटीझन्स भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 04:51 PM2020-07-15T16:51:41+5:302020-07-15T16:54:13+5:30
अशोक गहलोत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, देशात घोडेबाजार सुरु आहे
मुंबई - राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी भाजपात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सचिन पायलट यांच्या या विधानानंतर अशोक गहलोत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. मात्र, मुख्यमंत्री गेहलोत यांनी सचिन पायलट यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यावरुन भाजपा नेते आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे.
अशोक गहलोत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, देशात घोडेबाजार सुरु आहे. 20-20 कोटींना आमदारांना खरेदी केलं जात आहे. नवी पिढी हे सगळं बघत आहे. भाजपाकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अशोक गहलोत यांनी केला. तसेच, अशोक गहलोत पुढे म्हणाले की, नव्या पीढीवर आमचं प्रेम, येणारे दिवस त्यांचेच आहेत, आमचे सहकारी भाजपाच्या जाळ्यात फसले. भाजपाने कर्नाटक, मध्य प्रदेशसारखा खेळ राजस्थानात रचला असल्याचा दावा अशोक गहलोत यांनी केला आहे. चांगली इंग्रजी बोलणे, माध्यमांना चांगले बाइट देणे आणि सुंदर, देखणे दिसणे या सर्व गोष्टी काही उपयोगाच्या नाही. देशाबद्दल आपल्या मनात काय आहे, आपली विचारधारा, धोरणं आणि वचनबद्धता काय आहे, कशी आहे, या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात असं असं देखील गहलोत यांनी म्हटले.
Public नाराज़ हो गयी है ..मेरे इस ट्वीट पर
— Sambit Patra (@sambitswaraj) July 15, 2020
On Public Demand:
Retain only “English”
“Good bytes” & “Handsome” hereby stands withdrawn from “Rahul”!!
अब तो ठीक है ना?? https://t.co/NIMs1SVh7D
गेहलोत यांच्या या वक्तव्याची संबित पात्रा यांनी ट्विटरवरुन खिल्ली उडवली. सचिन पायलट यांना उद्देशून माध्यमांना चांगले बाईट देणे, सुंदर, देखणे असणे, हे गेहलोत यांचे वक्तव्य राहुल गांधींशी जोडण्याचा प्रयत्न पात्रा यांनी केला होता. त्यानंतर, अनेकांनी पात्रा यांना टार्गेट केले, तर काहींनी राहुल गांधींची खिल्ली उडवली. त्यानंतर, संबित पात्रा यांनी पुन्हा एकदा ते ट्विट रिट्विट करत, मी माझ्या ट्विटमधील काही शब्द काढून टाकत असल्याचे म्हटले. Good Byte & Handsome हे दोन शब्द मी कमी करत आहे, आता तरी ठिक आहे ना? असे म्हणत पात्रा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींची अप्रत्यक्षपणे खिल्लीच उडवली. पात्रा यांच्या या ट्विटवरही संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.