शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

राहुल गांधींच्या बोलण्याने मोदींना गुदगुल्या

By admin | Published: December 22, 2016 12:09 PM

नोटाबंदी निर्णयावरुन भ्रष्टाचाराचे आरोप करणा-या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे

ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 22 - नोटाबंदी निर्णयावरुन भ्रष्टाचाराचे आरोप करणा-या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे. 'राहुल गांधी अजून भाषण शिकत आहेत. जेव्हापासून त्यांनी बोलायला सुरु केलं आहे मला खूप आनंद झाला आहे. बरं झालं या तरूण नेत्यानं भाषणं द्यायला सुरुवात केली नाही तर भुकंप आला असता', असं सांगत मोदींनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे. '2009 पर्यंत या पाकिटात काय आहे कळतच नव्हतं, पण आता हळू हळू कळू लागलं आहे', असंही मोदी बोलले आहेत. महात्मा पंडित मदन मोहन मालविया कॅन्सर सेंटरच्या पायाभरणी कार्यक्रमाला मोदींनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते.
 
राहुल गांधी म्हणतात ज्या देशात 60 टक्के लोक अशिक्षित आहेत तिथे ऑनलाइन व्यवहार कसा करणार. पण हे तुमचंच रिपोर्ट कार्ड आहे असं सांगत मोदींनी पलटवार केला आहे. कोणाचं काळं धन तर कुणाचं काळं मन समोर येत आहे असंही मोदी बोलले आहेत. 
 
सध्या देशभरात साफसफाई अभियान सध्या सुरु आहे. अनेक जणांनी दावा केली की मोदींना निर्णय घेताना अंदाज नव्हता. पण देशातले काही पक्ष विरोधकांसोबत भक्कम उभे राहतील याचा खरंच अंदाज नव्हता असं सांगत मोदींनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. सीमारेषेवर ज्याप्रमाणे दहशतवाद्यांना घुसवण्यासाठी फायरिंग केली जाते तसंच काहीस संसदेत चालू आहे असं सांगत विरोधक पाकिस्तानसारखे वागत असल्याचं बोलले आहेत.
 
सामान्य जनतेला खूप त्रास झाला आहे, मात्र तरीही समर्थन करत आहेत. देशाच्या भल्यासाठी कष्ट सोसण्याची इतकी तयारी जगभरात कुणीच करत नाही असं सांगत मोदींनी लोकांचे आभार मानले. 
 
नोटाबंदी निर्णयावर टीका करणा-या विरोधकांना मोदींनी नावं घेऊन उत्तर दिलं आहे. मनमोहन सिंग, चिदंबरम यांना तुमची वक्तव्ये तुमचा रिपोर्ट कार्ड असल्याचं मोदी बोलले आहेत. मनमोहन सिंग स्वत:चे रिपोर्ट कार्ड देत होते की माझं  हेच कळत नव्हतं. ही 50 टक्के गरिबी तुमचंच देणं आहे. चिदंबरम 2014 मध्ये बोलत होते आम्ही विकास केला आहे, आणि आता म्हणतात आपल्या देशातील 50 टक्के गावांमध्ये वीज नाही. हे सर्व तुम्हीच केलं असून तुमचं रिपोर्ट कार्ड असल्याचं सांगत मोदींनी विरोधकांवर पलटवार केला. 
 
नकली नोटांचं 8 नोव्हेंबरला दफन करण्यात आलं आहे. माओवाद, नक्षलवाद, दहशतवाद सगळ्यांना एकत्रच संपवून टाकलं आहे. अनेक नक्षलवादी समर्पण करत आहेत, कारण पैसेच नाही तर जेवायला देणार कोण असं सागंत मोदींनी नोटाबंदी निर्णयाचा फायदा होत असल्याचं सांगितलं आहे.