राहुल गांधी यांच्या ट्विटवर नेटिझन्सची बॅटींग, इटली दौऱ्यावर केले ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 03:06 PM2018-03-02T15:06:34+5:302018-03-02T15:06:34+5:30
आज सकाळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केल.
नवी दिल्ली - होळीमुळं सगल लागून आलेल्या चार दिवसांच्या सुट्यामुळं प्रत्येकजण आपापल्या प्लॅन करत असतो. यामध्ये सर्वसामान्यांपासू बॉलिवूड, खेळाडू आणि राजकीय नेतेही आपापल्या कुटुंबिंयासोबत होळी साजरी करत आहेत. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मागे कसे राहितील. होळीला ते आजीकडे जाणार असल्याची त्यांनी ट्विटरवर माहिती दिली. त्यांच्या या ट्विटवर लोकांनी त्यांची खिल्ली उडवली. नेटीझन्सनी अतिशय मजेदारपणे त्यांना प्रतिप्रश्न विचारले.
आज सकाळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केल. ट्विटरवर त्यांनी प्रथम सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. होळीच्या सुट्टीसाठी मी 93 वर्षीय आजीकडे जाणार आहे. ती दयाळू आहे. मी आजीला भेटायला जाऊन सरप्राइज देणार आहे. असे ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. गेल्यावर्षी 19 जून ला आजीच्या वाढदिवसालाही राहुल गांधी भेटायला गेले होते. उद्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांचा निवडणुकीचा निकाल उद्या आहे. पण निकालादिवशी ते भारतात नसणार आहेत. ते इटालीमध्ये होळीच्या सुट्टीवर आहेत.
My Nani is 93. She’s the kindest soul ever. This Holi weekend, I’m going to surprise her! I can’t wait to give her a hug.... #HappyHoli to all of you. Have a joyful celebration..
— Office of RG (@OfficeOfRG) March 1, 2018