नवी दिल्ली - लोकमत पार्लमिंटरी अवॉर्ड सोहळ्यातील 'लोकमत नॅशनल कॉन्ल्केव्ह' सत्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस देशातील पाच राज्यांच्या निकालाबात स्पष्टीकरण दिले. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वार खोचक टोला लगावला. राहुल गांधी विरोधक म्हणून चांगल काम करत आहेत, त्यांना अजून पुढील 5 ते 10 वर्षे विरोधकाचे काम करायचे आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये झालेला पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि एकूणच भाजपाला धडा शिकवणारा आहे, त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, असं म्हटलं जातंय. परंतु, हे निकाल म्हणजे भाजपाचा मोठा पराभव आहे, हे मानायलाच भाजपाचे नेते तयार नसल्याचे संकेत आज मिळाले. 'लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड' सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या 'लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह'मध्ये आधी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आणि नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकड्यांचा खेळ करून पराभवाची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तसेत राहुल गांधींच्या नेतृत्वावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. मोदी सरकारविरोधात देशात महाआघाडी होणार आहे, त्याबाबत फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, महाआघाडीचा काहीही परिमाण होणार नाही.
तसेच राहुल गांधींचे अभिनंदन, त्यांना मोठं यश मिळाल आहे. पम, हा भाजपा मोठा पराभव नाही. देशात विरोधी पक्ष शक्तिशाली असावा अशी आमची भावना आहे. राहुल गांधी विरोधक म्हणून चांगल काम करत आहेत. पुढील 5 ते 10 वर्षे त्यांना आणखी विरोधक म्हणून काम करायचं आहे, असा खोचक टोलाही फडणवीस यांनी लगावला. तर राम मंदिराबाबत बोलतानाही फडणवीस यांनी मंदिर बनवणे हा आमचा संकल्प आहे, पण तो निवडणुकीचा मुद्दा नाही. राज्यसभेत राहुल गांधींनी आम्हाला साथ दिल्यास याबाबतचा कायदा नक्कीच अमलात येईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले आहे.