नवी दिल्ली : संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी अभिनेता आमिर खानवर टीका केल्यानंतर रविवारी काँग्रेसने पर्रिकर आणि आरएसएस यांच्यावर निशाणा साधला. द्वेष हे डरपोक व्यक्तींचे हत्यार आहे आणि ते कधीच विजय मिळवू शकत नाहीत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीका केली. दलित, अल्पसंख्याक, लेखक, अभिनेते आणि मोदी सरकारच्या विरुद्ध असंतोष व्यक्त करणाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे, असा आरोपही काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टिष्ट्वट केले आहे की, आरएसएस आणि पर्रीकर हे प्रत्येकाला धडा शिकवू पाहत आहेत. येथे आपल्यासाठीही एक शिकवण आहे की, द्वेष हे डरपोक व्यक्तींचे हत्यार आहे आणि ते कधीच जिंकू शकत नाहीत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी टिष्ट्वट केले आहे की, पाकिस्तानसारख्या बाहेरील शक्तींपासून देशाचे संरक्षण करणे हे पर्रिकर२२ यांचे काम आहे की, आमिर खानसारख्या देशातील अभिनेत्यांना धमकी देणे हे त्यांचे काम आहे? पर्रीकर यांचे वक्तव्य म्हणजे दलित आणि अल्पसंख्याकांविरुद्ध जे कारस्थान सुरू आहे त्याचा पर्दाफाशच यातून होत आहे. हाच राजधर्म आहे काय? असा सवालही यातून करण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)>काय म्हणाले होते पर्रिकर?पुण्यात एका कार्यक्रमात पर्रिकर यांनी अप्रत्यक्षपणे आमिर खानवर टीका केली होती. एका अभिनेत्याने असे सांगितले की, त्यांची पत्नी देशाबाहेर जाऊ इच्छिते. जर मी गरीब असेल आणि माझे घर छोटे असेल तर काय झाले? तरीही मी माझ्या घरावर प्रेम करीन आणि त्या घराचा बंगला करण्याचे स्वप्न ठेवीन. देशाविरुद्ध बोलणाऱ्यांना धडा शिकवायला हवा, असेही ते म्हणाले होते.
राहुल यांनी साधला पर्रिकरांवर निशाणा
By admin | Published: August 01, 2016 1:40 AM