- शीलेश शर्मा नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींपासून सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या धारदार हल्ल्याला उत्तर देण्यासाठी १ ते ३ नोव्हेंबरपर्यंत राहुल गांधी दक्षिण गुजरातचा दौरा करतील. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा गुजरातचा पहिलाच दौरा असेल, असे मानले जाते.गुजरात राज्याच्या दौ-याच्या तिस-या टप्प्यात राहुल गांधी मोदी यांनी १६ आॅक्टोबर रोजी गांधीनगरमध्ये नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर भाषणात जो हल्ला चढवला त्याला उत्तर देतील. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही गांधी हल्ला करतील. राहुल यांच्या भाषणात विकास केंद्रबिंदू असेल. कारण मोदी यांनी काँग्रेसला विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढण्याचे आव्हान दिले आहे. राहुल टीमने राहुल गांधी यांच्यासाठी भाजपाच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत विकासाची किती कामे झाली, याची आकडेवारी गोळी केली आहे. ती राहुल गांधी लोकांना सांगतील. गुजरातला जायच्या आधी राहुल गांधी हिमाचल प्रदेशचा दौरा करतील, असे समजते, परंतु त्यांचा कार्यक्रम अजून निश्चित झालेला नाही.राहुल गांधी यांच्या गुजरात दौ-याच्या आधी पक्षाचे सरचिटणीस अशोक गेहलोत गुजरामधील निवडणूक प्रचाराचे काम बघत आहेत व ते मोदी व शाह यांच्यावर हल्लेही करीत आहेत.
मोदींना उत्तर देण्यासाठी राहुल गुजरातेत जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:18 AM