बंगळुरू : कर्नाटकातील राजकारणात भाजपा विरोधात काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) ठामपणे उभे असतानाच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, असेही पंतप्रधान मोदी यांनी त्यांना सांगितले.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही देवेगौडा यांना वाढदिवसाच्या ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. पण तेवढ्यावर न थांबता राहुल गांधी माजी पंतप्रधानांना फोन केला. त्यांना शुभेच्छा देताना तब्येतीची चौकशी केली. शिवाय राहुल गांधी यांनी देवेगौडा यांची चक्क माफीही मागितली. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात राहुल गांधी यांनी जनता दल (धर्मनिरपेक्ष) तसेच देवेगौडा यांच्यावर जोरदार टीका केली होती. तो पक्ष म्हणजे भाजपाची बी टीम आहे, असा आरोपही काँग्रेसतर्फे करण्यात आला होता. पूर्वी जनता दल व भाजपाने राज्यात एकत्र येऊ न सरकार स्थापन केल्याचा त्याला संदर्भ होता. पण या निवडणुकीनंतर सारेच संदर्भ बदलले आणि भाजपावर कुरघोडी करण्यासाठी काँग्रेस व जनता दल एकत्र आले आहेत. त्यामुळेच तेव्हाच्या आरोपांबद्दल राहुल यांनी माफी मागितली.भारताचे माजी पंतप्रधानआणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्यावर संपूर्ण देशातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मात्र चक्क त्यांची माफी मागितली आहे.>मायावती यांची टीकानिवडणूक प्रचाराच्या काळात जनता दलाला भाजपाची बी टीम म्हटल्याबद्दल बसपाच्या नेत्या मायावती यांनी आता काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसच्या त्या टीकेने मुस्लिमांच्या मतांची विभागणी झाली आणि त्याचा फायदा भाजपाला झाला, असा आरोप त्यांनी केला. अशी मतविभागणी झाली नसती तर भाजपाला १0४ जागा मिळाल्याच नसत्या, असेही त्या म्हणाल्या. या निवडणुकीत बसपा व जनता दल यांची आघाडी होती. बसपाचा एक उमेदवारही त्यामुळे विजयी झाला.
देवेगौडांच्या वाढदिवशी राहुल यांची माफी, पंतप्रधानांसह अनेकांनी दिल्या शुभेच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:33 AM