शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

राहुल यांची अध्यक्षपदावर बढती पुन्हा लांबणीवर

By admin | Published: June 15, 2016 3:58 AM

राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. राहुल गांधींना बढती देऊन पक्षाध्यक्ष बनविण्याची मागणी काँग्रेसमध्ये

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली

राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. राहुल गांधींना बढती देऊन पक्षाध्यक्ष बनविण्याची मागणी काँग्रेसमध्ये जोर धरत असली तरी त्यांना नजीकच्या काळात बढती मिळण्याची शक्यता दिसत नाही.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यासाठी बोलावण्यात येणारे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन किमान आणखी दोन महिनेपर्यंत तरी घेण्यात येण्याची शक्यता नाही, असे काँग्रेसमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. ‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन आता आॅगस्टअखेर किंवा सप्टेंबरमध्ये घेण्यात येऊ शकते,’ असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.काँग्रेसमधील बहुतांश मोठे निर्णय राहुल गांधी हेच घेत असतात. त्यामुळे त्यांचा बढतीने हेतू साध्य होईल असे वाटत नाही. आपण दोन वर्षांपासून ज्या चमूवर विश्वास टाकला, त्या चमूने आपल्या अपेक्षेप्रमाणे काम केले नाही, याची राहुल गांधी यांना फार उशिराने जाणीव झाली आहे. राज्यसभेत पाठविण्यात आलेले मधुसूदन मिस्त्री यांनाही उत्तर प्रदेशातील काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्यात अपयशच आले आाहे. काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नसणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी यांचे व्यूहरचनाकार असलेले प्रशांत किशोर यांच्यासोबतही जुळवून घेण्यात मिस्त्री यांना अपयशच आले आहे, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.गुलाम नबी आझाद यांना उत्तर प्रदेशमधील प्रभारी सरचिटणीसपदी तर कमलनाथ यांना पंजाब व हरियाणातील प्रभारी सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आल्यामुळे राहुल गांधी यांना सोनिया गांधी यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांवरच विश्वास ठेवावा लागला आहे, हे स्पष्ट झाले. पाच राज्यांतील निवडणुकीवरच अधिक लक्ष काँग्रेसमध्ये आणखी मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे आणि सरचिटणीस सी.पी. जोशी यांच्याकडे आणखी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. परंतु तूर्तास राहुल गांधी यांना बढती देऊन पक्षाध्यक्ष बनविण्याऐवजी पुढील वर्षाच्या प्रारंभी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरच अधिक लक्ष देण्याचा काँग्रेसचा मानस आहे. कमलनाथ हे कधीही राहुल गांधी यांना पसंत नव्हते आणि गेल्या दोन वर्षांपासून त्यांना बाजूला सारण्यात आले होते. परंतु आता त्यांना प्रभारी सरचिटणीस बनविण्यात आल्याने सोनिया गांधी ह्या काँग्रेसमध्ये अधिक सक्रिय भूमिका बजावत असल्याचे संकेत मिळाले आहेत.