- शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी सद्भावनेसाठी राजघाट येथे उपोषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित विरोधी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. जातीय हिंसाचार, जातीयवाद आणि संसदेचे कामकाज न चालल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या नेत्यांनी राजघाटावर हा उपोषण केले.राहुल म्हणाले की, आम्ही भाजपविरुद्ध उभे राहिलो. त्यांचा २०१९ साली पराभव करू. उपोषणस्थळी १९८४ च्या शीखविरोधी दंगलीची छाया दिसून येत होती. या प्रकरणातील आरोपी सज्जन कुमार व जगदीश टायटलर तिथे येताच, दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी त्यांना परत जाण्यास सांगितले.>उपोषणाआधी छोले-भटुरे; राहुल गांधी झाले नाराजदलितांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या सोमवारच्या देशव्यापी उपवास आंदोलनाच्या आधी पक्षाच्या चार नेत्यांनी हॉटेलमध्ये पोट भरून छोले-भटुरे खाल्ल्याने भाजपाने त्यांच्या उपोषणाची थट्टा केली. अजय माकन, हारून युसुफ, अरविंद लव्हली हे चौघे चांदणी चौकातील हॉटेलमध्ये छोले-भटुरे खात असतानाचे छायाचित्रच भाजपाने प्रसिद्धीस दिले.भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसचे नेते भोगवादी आहेत, असल्याची टीका केली. त्यावर माकन यांनी उपोषण सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंतचा होते व लाक्षणिक होते. नाश्ता करून सहभागी व्हायला बंदी नव्हती, असे सांगितले. मात्र, या नेत्यांवर राहुल गांधींसह अनेक नेते नाराज झाले. या नेत्यांनी आज तरी हॉटेलात खाणे योग्य नव्हते, असे एका नेत्याने बोलून दाखविले.
राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचे दिवसभर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 4:19 AM