भाजपा नेत्याच्या कुक्कुटपालन फार्मवर धाड; दारुच्या १,४०० बाटल्या जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 15:03 IST2023-12-27T15:02:04+5:302023-12-27T15:03:30+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना याप्रकरणी खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती.

भाजपा नेत्याच्या कुक्कुटपालन फार्मवर धाड; दारुच्या १,४०० बाटल्या जप्त
देशभरातील अनेक राज्यात ईडी व सीबीआयकडून धाडी टाकण्यात आल्याचे वृत्त वाचण्यात येते. मात्र, या वृत्तामध्ये संबंधित व्यक्ती ही विरोधी पक्षातील किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या जवळील असल्याचा आरोप विरोधकांकडून होतो. भाजपा नेत्यांवर कुठलीही रेड पडत नाही, असेही विरोधक म्हणतात. मात्र, केरळपोलिसांनी भाजपा नेत्याच्या कुक्कुटपालन फार्मवर धाड टाकली असून मोठ्या प्रमाणात दारु जप्त केली आहे. येथील फार्मवर असलेल्या एका गोदामातून १४ हजारांपेक्षा जास्त विदेशी दारुच्या बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना याप्रकरणी खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर, पोलिसांनी कारवाई करत स्थानिक भाजपा नेते आणि माजी पंचायत समिती सदस्य लालू आणि त्यांचा सहकारी लॉरेंस यांना अटक केली. येथील फॉर्म हाऊसवरुन मोठा दारुसाठा आणि स्प्रीट जप्त करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. कोडकारा येथील वेल्लानचिरा येथील कुक्कुटपालन फार्मवर ही दारू ठेवण्यात आली होती. येथील गोदामात असलेल्या गुप्त खोलीतून ही दारु जप्त करण्यात आली आहे. चल्लाकुड्डी आणि इरिनजालाकुडा यांच्या नेतृत्त्वात ही छापेमारी करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, छापेमारीवेळी आम्ही शेतात बनत असलेल्या गोदामातून स्प्रीट व दारुसाठा जप्त केला. याप्रकरणी इतरही आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. येथून स्प्रीटची वाहतूक केली जात असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. आत्तापर्यंत आयएमएफएल स्टिकरसह जप्त करण्यात आलेल्या १४००० दारुच्या बाटल्यांच्या सोर्सचा तपास लागला नाही, पोलिसांकडून तो तपास सुरू आहे.