शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

कर्नाटकातील ‘त्या’ रिसॉर्टवर छापे, गुजरातचे आमदार ठेवलेले हॉटेल मंत्र्याच्या मालकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 4:30 AM

भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे गुजरातमधील काँग्रेसच्या ४४ आमदारांना बंगळुरूच्या ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे, तिथे ...

बंगळुरू : भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे गुजरातमधील काँग्रेसच्या ४४ आमदारांना बंगळुरूच्या ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे, तिथे तसेच त्याचे मालक असलेले कर्नाटकचे ऊ र्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापे घातले. या छाप्यामुळे राजकीय खळबळ माजली असून, आमच्या आमदारांवर दबाव आणण्यासाठीच छापे घालण्यात आले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या विषयावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.काँग्रेसचे गुजरातमधील राज्यसभेचे उमेदवार अहमद पटेल यांनी आमदारांवर दबाव आणण्यासाठी व सुडबुद्धीने हे करण्यात आल्याचा आरोप केला आहे. राज्यसभेत गुलाब नबी आझाद व आनंद शर्मा तसेच लोकसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनीही असाच आरोप केंद्र सरकारवर केला.मात्र ईगलटन गोल्फ रिसॉर्टमध्ये डी. के. शिवकुमार यांच्या दालनातच छापा घालण्यात आला. तिथे ते काही कागदपत्रे फाडताना दिसून आले. त्यांच्या निवासस्थानीही छापा घालण्यात आला.मुख्यमंत्री संतापले-आमदार तिथे राहत असल्यामुळे त्यासाठीच्या भाड्याची रक्कम बँकेद्वारे रिसॉर्टच्या खात्यात जमा करण्यात आली आहे, असे काँग्रेसने सांगितले. छाप्यांची माहिती स्थानिक पोलिसांना द्यायची असते. पण या छाप्यांपूर्वी अशी सूचना देण्यात आली नाही. तसेच सीआरपीएफला तिथे नेल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संताप व्यक्त केला.