ॅंमिल्ली कौंन्सिल अध्यक्षपदी रागीब अहेमद
By admin | Published: April 24, 2016 12:38 AM
मिल्ली कौंन्सिल अध्यक्षपदी रागीब अहेमद
मिल्ली कौंन्सिल अध्यक्षपदी रागीब अहेमदजळगा - ऑल इंडिया मिल्ली कौंन्सिल शहर कार्यकारिणी जाहीर होऊन अध्यक्षपदी रागीब अहेमद यांची निवड करण्यात आली आहे. कौन्सिलच्या जिल्हा कार्यालयात बैठक होऊन ही निवड करण्यात आली. उपाध्यक्ष ॲड. युनुस शेख, ॲड. अबरार जहागिरदार, शेख इम्रान शेख आमीर, आसिफ पठाण, सचिव यासिम खान इब्राहीम खान, सहसचिव शेख अनिसुद्दीन अलाउद्दीन, रशीद अकबर खान, कासीम उमर रफीक अहेमद, खजिनदार जमीर असगर नागोरी आदींची निवड झाली. वंदना तायडे नेट परीक्षा उत्तीर्ण जळगाव - प.न. लुंकड कन्या शाळेच्या शिक्षिका वंदना बाबुलाल तायडे या मराठी विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्या शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. नशिराबाद येथे हनुमान जयंती उत्साहातजळगाव - नशिराबाद येथील वळची आळी भागातील संत सावता मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त ह.भ.प. सुनील शास्त्री महाराज यांच्या हस्ते हनुमान मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर वरची आळी भागात भजनाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. ह.भ.प. रमेश पाटील व सर्व भजनी मंडळ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सभासद व नागरिकांनी परिश्रम घेतले. सिंधी कॉलनीत पाण्याचा तुटवडाजळगाव - सिंधी कॉलनी भागात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत असून कमी दाबाने पाणी मिळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही समस्या जाणवत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना ही समस्या काही जास्तच जाणवत असल्याची तक्रार वासुदेव कुकरेजा, कपिल मेहता यांनी केली आहे. मनपाने याबाबत नियोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अरिहंत भवनातप्रवचनाचे आयोजनजळगाव - अरिहंतमार्गी जैन महासंघातर्फे रविवारी २४ पासून प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य प्रवर ज्ञानचंद्रजी म.सा. यांचे प्रवचन होईल. प्रचवचनाची वेळ सकाळी ९ ते १० अशी असून अरिहंत भवन दाढीवाला बंगला येथे हे प्रचवन होईल. सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.