नवी दिल्ली : हिराखंड एक्स्प्रेसला घडलेला हा गेल्या दोन महिन्यांतील तिसरा मोठा रेल्वे अपघात आहे. हा अपघात आहे की घातपात याची रेल्वे मंत्रालय चौकशी करीत असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) चे पथकही सोमवारी घटनास्थळी रवाना झाले आहे. हे पथक घतपाताच्या शक्यतेचा तपास करणार आहे.आंध्र प्रदेशात जगदलपूर-भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेस रुळावरून घसरून झालेल्या भीषण दुर्घटनेत ४१ जण ठार, तर अन्य ५० जण जखमी झाले. २१ आणि २२ जानेवारीदरम्यान रात्री विजयनगरम जिल्ह्यात घडलेल्या या रेल्वे दुर्घटनेमागे घातपाताचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. दोन महिन्यांत घडलेल्या तीन भीषण रेल्वे अपघातामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.हिराखंड एक्स्प्रेसला ज्या भागात अपघात झाला तो भाग ओडिशाच्या सीमेला लागून असून, हा भाग नक्षलग्रस्त आहे. अपघाताच्या काही सेकंदापूर्वी ट्रेन चालकाला फटाके फुटल्यासारखा आवाज ऐकू आला होता. काही समजण्याआधीच हिराखंड एक्स्प्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
रेल्वे अपघात की घातपात?
By admin | Published: January 24, 2017 3:38 AM