छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल दरम्यान उन्नत मार्ग आणि चर्चगेट विरार दरम्यान एलिव्हेटेड कॉरीडॉरच्या निर्मितीची घोषणा केली मात्र सध्या होत असलेल्या त्रासातून सुटका होईल अशी कोणतीही घोषणा केली नाही.
असहय्य झालेल्या गर्दीतून प्रवास सुकर व्हावा यासाठी उपनगरीय मार्गावरील रेल्वे गाडया वाढवण्याची घोषणा प्रभू करतील अशी प्रवाशांना अपेक्षा होती. मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
अर्थसंकल्पातून मुंबईकर रेल्वे प्रवाशांना भरपूर अपेक्षा होत्या. मात्र उपनगरी रेल्वे प्रवाशांना सुखावेल अशी कोणतीही घोषणा प्रभूंनी केली नाही.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी आर्थिक तुटीसह विविध आव्हानांचा सामना करत भविष्यात नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या योजनांवर अधिक भर दिला
हे बजेट माझं नसून लोकांचं बजेट असल्याचं सांगत या वर्षामध्ये १.२१ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट प्रभूंनी ठेवलं आहे.
पाच वर्षांमध्ये भारतीय रेल्वे ८.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल असं सांगत भारतीय रेल्वे ही प्रत्येकासाठी गर्वाची बाब ठरेल असा आत्मविश्वास रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला.
रेल्वे अर्थसंकल्प रेडिओवर ऐकत असताना मुरादाबाद येथील रेल्वे कर्मचारी
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज (गुरुवार) लोकसभेत आपला दुसरा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला.