शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
2
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
3
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
4
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
5
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
6
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
7
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
8
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
9
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
10
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
11
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
12
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
13
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू
14
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
15
खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
16
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये
17
धक्कादायक! उत्तर प्रदेशातील 'ब्लू ड्रम'नंतर आता उत्तराखंडमध्ये पत्नीने पेट्रोल ओतून पतीला जाळले
18
“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
19
ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार
20
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले...

Railway Budget 2025: रेल्वेची गाडी जुन्याच रुळावरून धावणार, किती कोटींची तरतूद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 09:07 IST

Budget 2025 Railway Allocation: रेल्वेची नवीन लाईन टाकण्यासाठी ३२,२३५ कोटी रुपये आणि लाईन दुपदरीकरणासाठी ३२,००० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

-महेश घोराळेयंदाच्या अर्थसंकल्पात सलग दुसऱ्या वर्षी भारतीय रेल्वेसाठी कोणतीही ठोस घोषणा केली नाही. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी भारतीय रेल्वेला २.५२ लाख कोटी रुपयांचे बजेट देण्यात आले आहे. मागील अर्थसंकल्पातही हाच आकडा होता. रेल्वे क्षेत्राबाबत, सुरक्षेवर आणि गाड्यांना वीज जोडण्याची प्रक्रिया वेगवान करण्यावर भर देण्यात आला आहे.

रेल्वेची नवीन लाईन टाकण्यासाठी ३२,२३५ कोटी रुपये आणि लाईन दुपदरीकरणासाठी ३२,००० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच गेज लाईन बदलण्यासाठी ४,५५० कोटींचे बजेट देण्यात आले आहे. 

याशिवाय अपघात टाळण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींवर भर देण्यात आला आहे. त्यामध्ये सिग्नल आणि टेलिकॉम सिस्टीमसाठी सहा हजार कोटींहून अधिक तरतूद करण्यात आली आहे. वीज वाहिन्यांवर ६,१५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय रेल्वे कर्मचारी कल्याण, त्यांचे प्रशिक्षण, रेल्वे सुरक्षा निधी यासाठीही तरतूद करण्यात आली आहे.

कवचचे अपग्रेडेशन

अर्थसंकल्पात रेल्वेबाबत नवीन घोषणा करण्याऐवजी, पूर्वीच्या घोषणा पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. रेल्वे अपघात कमी करण्यासाठी कवच प्रणालीचे अपग्रेडेशन केले जाईल. रेल्वे मार्गावर त्याचे ४.० व्हर्जन लागू करण्याचे काम जलदगतीने केले जाईल. यामध्ये रिसर्च डिझाइन अॅण्ड स्टँईडस ऑर्गनायझेशनकडून मान्यता मिळाली आहे. दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता मार्गावरही कवच सिस्टीम बसविल्या जातील.

१०० अमृत भारत एक्सप्रेस गाड्या पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे आभार. त्यांनी रेल्वेच्या वाढीसाठी मोठे पाठबळ दिले आहे. रेल्वेसाठी २.५२ लाख कोटी रुपये अर्थसंकल्पीय सहाय्य आहे. ही बाब खरोखरच गरजेची होती. रेल्वे जाळ्याचा विस्तार होत असून आधुनिक प्रकारच्या गाड्या आणल्या जात आहेत आणि त्याचवेळी सुरक्षिततेवरही भर दिला जात आहे. एकूण नवीन प्रकल्प पाहिले तर सुमारे १०० नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या तयार केल्या जातील. तसेच ५० नमो भारत ट्रेन, सुमारे २०० वंदे भारत ट्रेन तयार केल्या जातील. -अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे मंत्री

विशेष गुंतवणूक किती तरतूद ?

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, संयुक्त उपक्रम आणि विशेष उद्देशाची वाहने यासाठीच्या गुंतवणूकीसाठी २२,४४४ कोटींची तरतूद केली आहे.

टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेBudgetअर्थसंकल्प 2024Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णव