रेल्वे अर्थसंकल्प .....जोड
By admin | Published: February 22, 2016 7:28 PM
नवीन गाड्या सुरु करा
नवीन गाड्या सुरु कराअनेक वर्षा पूर्वी बंद केलेली सायंकाळची भुसावळ -मुंबई पॅसेंजर पुन्हा सुरु करण्याची मागणी आहे. या पॅसेंजर मुळे नोकरी व कामासाठी जिल्ाच्या ठिकाणी आलेल्यांना प्रवाशी नागरीकांना फायदा होईल. यामुळे रात्री उशीरा धावणार्या एक्सप्रेस गाड्यांची गर्दी कमी करण्यासही मदत होणार आहे. शिवाय सद्याच्या मुंबई पॅसेंजरचे डबे वाढविणे.मुंबई लोकलच्या धर्तीवर (मेमो) अमरावती - नाशिक दरम्यान शटल सेवा सुरु करावी. दिवस भरातून तीच्या दोन-तीन फेर्या असाव्यात.भुसावळ -नाशिक -ईगतपुरी दरम्यान इंटरसीटी व बंद करण्यात आलेली दादर -मुंबई एक्सप्रेस नियमित सुरु करने.जिल्हाभरातून शहरात रोज नोकरीच्या कामासाठी स्वतंत्र पॅसेंजर गाड्या सुरु करने. पुणेसाठी एक्सप्रेसजळगाव, भुसावळहून पुने जाण्यासाठी पॅसेंजर गाडी नसल्याने प्रवाशांना मनमाडमध्ये टप्पा घेऊन पुढे जावे लागत असल्याने पुण्यासाठी स्वतंत्र पॅसेंजर सुरु करने. अथवा मनपाड -पुणे पॅसेंजर भुसावळ पर्यंत चालविणे.अनेक वर्षा पासून १६ डबे घेऊन धावणार्या महाराष्ट्र एक्सप्रेस गाडीला इतर गाड्यांप्रमाणे डबे वाढवून २०-२२ डब्यांची करणे. महाराष्ट्र एक्सप्रेस नंतर जळगावला रात्री ९ वाजता पोहचेल अशी अकोला ते पुने दरम्यान एक्सप्रेस गाडी नियमित सुरु करणे. अशा मागण्यांसाठी प्रवासी संघटना, रेल्वेच्या ग्राहक उपभोक्त समितीचे सदस्य व प्रवाशांकडून शासन व लोकप्रतिनिधींमार्फत प्रयत्न सुरु आहे मात्र पदरात काय पडते हे २५ रोजीच समजणार आहे.