शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

जाहीरात, प्रचार आणि एटीएमद्वारे 16 हजार 500 कोटी कमावणार रेल्वे

By admin | Published: January 11, 2017 12:06 AM

प्रवासी भाडं वाढवूनही आवश्यक तेवढी कमाई होत नसल्याने भारतीय रेल्वे उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - प्रवासी भाडं वाढवूनही आवश्यक तेवढी कमाई होत नसल्याने भारतीय रेल्वे उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहे.  यासाठी जाहीरातींद्वारे पुढील 10 वर्षांमध्ये 16 हजार 500 कोटी रूपये कमावण्याचा रेल्वेचा प्रयत्न असणार आहे.  
 
यासाठी प्लॅटफॉर्मवर एटीएम बसवण्यात येतील, 3 हजार स्थानकांवर डिस्प्ले नेटवर्क उभारलं जाईल याशिवाय जाहिरातींसाठी रेल्वे रेडिओचाही वापर केला जाईल.  प्रवासी भाड्या व्यतिरीक्त मिळणा-या महसूल योजनेत भागिदारीसाठी इच्छूक खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी रेल्वेने  धोरण जाहीर केलं आहे.  
 
प्रवासी भाड्या व्यतिरीक्त मिळणा-या महसूलसाठी कंत्राट काढले जातील आणि ही प्रक्रिया पारदर्शी असेल अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. 2016-17 च्या रेल्वे अर्थसंकल्पात महसूल वाढवण्याची घोषणा केली होती. यामध्ये आतापर्यंत 43 टक्के वाढ झाली आहे. मात्र हे समाधानकारक नाही असं प्रभू म्हणाले.
 
यामुळे रेल्वे स्थानकांच्या बाहेर, प्लॅटफॉर्म, पादचारी पुल, क्रॉसिंग गेट आदी ठिकाणं जाहिरातींसाठी रेल्वे डिस्प्ले नेटवर्कसाठी उपलब्ध करून देणार आहे. 10 वर्षांसाठी जाहीरातींचा कंत्राट दिले जातील. यासाठी मुंबई आणि दिल्ली वगळता एक किंवा अनेक विभागांसाठी अर्ज संयुक्तरीत्या मागवले जातील. ही संपूर्ण प्रक्रिया ई-ऑक्शनद्वारे होईल. याद्वारे 10 वर्षात 6 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची रेल्वेला अपेक्षा आहे.     
 
रेल्वेच्या बाहेरील व आतील भागातही जाहिराती लावल्या जातील यामध्ये खिडक्या,दरवाजे आदींचा समावेश असणार आहे. याची सुरूवात शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसद्वारे होईल. याद्वारे 10 वर्षात 2 हजार कोटी कमावण्याची रेल्वेची अपेक्षा आहे.  
 
ट्रेन तसेच प्लॅटफॉर्मवर ऑडिओ किंवा व्हिडीओ प्रणालीद्वारे कमाई केली जाईल. दोन्ही प्रणालींद्वारे फिल्म, टीव्ही-शो किंवा माहितीपर कार्यक्रमांचं प्रसारण केलं जाईल. याद्वारे 10 वर्षात 6 हजार कोटी उत्पन्न मिळण्याची रेल्वेला अपेक्षा आहे.  
    
महत्वाच्या  स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर बॅंकांना एटीएम उभारण्याची परवानगी दिली जाईल. याद्वारे रेल्वेला 10 वर्षात 2500 कोटी रूपये मिळण्याची अपेक्षा आहे.