देशात मंदीचं वातावरण असताना, त्यावर तोडगा काढण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन नवनव्या घोषणा करत असताना, केंद्रीय मंत्रिमंडळाने आज रेल्वे कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. या घोषणेमुळे त्यांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे.देशातील ११ लाख ५२ हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून ७८ दिवसांचं वेतन देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गेली सलग सहा वर्षं रेल्वे कर्मचाऱ्यांना विक्रमी बोनस दिला जात आहे. तोच सिलसिला कायम ठेवत यंदाही त्यांना ७८ दिवसांचं वेतन बोनस म्हणून दिलं जाईल, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केलं. याचा फायदा जवळपास साडे अकरा लाख कर्मचाऱ्यांना होईल. या बोनसवर रेल्वेचे २०२४ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
Bonus For Railway Employee : रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी 'दिवाळी भेट', ७८ दिवसांचा पगार 'बोनस'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 3:45 PM